Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

रायगडमध्ये महायुतीत वातावरण तापलं! शिवसेना कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला थेट इशारा; 20 ते 25 गाड्यांमधून सिनेस्टाईल एंट्री;

रायगडमध्ये महायुतीत वातावरण तापलं! शिवसेना कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला थेट इशारा; 20 ते 25 गाड्यांमधून सिनेस्टाईल एंट्री;

रायगड : रायगड जिल्ह्यातील शिंदेसेना विरुद्ध राष्ट्रवादीमधील राजकारणातील तणाव आणखी चिघळला आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेनंतर आमदार महेंद्र दळवी समर्थक संतप्त झाले आहेत. आमदार दळवी यांचे भाचे व युवासेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा 20 ते 25 गाड्यांसह महाड शहरात दाखल झाला. यावेळी देशमुख यांना थेट इशारा देत “राजकीय टीका सहन करू पण वैयक्तिक घाणेरडे हल्ले सहन केले जाणार नाहीत” असा इशाराच या कार्यकर्त्यांनी महाडमध्ये जाऊन दिला.

खासदार सुनील तटकरे हे ठाकरे गटाला मदत करत असल्याचा आरोप महेंद्र दळवी यांनी केला होता. त्यानंतर, आता रायगड जिल्ह्यातील महाडमधील शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यकर्त्यांनी महाडमधील राष्ट्रवादीचे नेते स्नेहल जगताप यांच्या सहकाऱ्याला दम दिल्याने राजकीय तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, याआधीच शिंदे सेनेचे राजा केणी यांनी देखील देशमुखांच्या वक्तव्यावरून त्यांना आव्हान दिले होते. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटलेला हा महायुतीतीलच शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद रायगडच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहे.

1992 रायगड त्यांचा बालेकिल्ला ठरला आहे. सुनिल तटकरेंच्या पायाला हात लावून जे मोठे झाले, त्यांनी तटकरे यांच्यावरील टीका थांबवावी, अन्यथा याहीपेक्षा परखड शब्दात उत्तर दिले जातील. हा डोंबाऱ्याचा खेळ थांबवावा, आम्हाला तुमच्या कौटुंबिक गोष्टीवर बोलायचं नाही. आम्हाला तुमच्यावर 498 दाखल आहे, त्यावर बोलायचं नाही, असे म्हणत धनंजय देशमुख यांनी अलिबागच्या आमदारांनाही इशारा दिला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!