Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Accident News : वाढदिवसाचा जल्लोष ठरला शेवटचा प्रवास; पार्टीहून परतताना भीषण अपघात; बर्थडे बॉयसह ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : वाढदिवसाचा जल्लोष ठरला शेवटचा प्रवास; पार्टीहून परतताना भीषण अपघात; बर्थडे बॉयसह ३ मित्रांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : सोलापूर-हैदराबाद महामार्गावर गुरुवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात वाढदिवस साजरा करून परतणाऱ्या तिघा मित्रांचा करुण अंत झाला. या दुर्घटनेत अमोल श्रीशैल येरटे, शेखर सुरेकर आणि कादर सैदू हंडे यांचा मृत्यू झाला असून संपूर्ण सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरातील शांती चौक परिसरातील सुझुकी शोरूममध्ये काम करणारे पाच मित्र कादर हंडेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी देगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये गेले होते. रात्री उशिरापर्यंत पार्टी करून सर्वजण कारने घरी परतत होते.

पहाटे दीडच्या सुमारास त्यांची कार पर्ल गार्डन परिसरात पोहोचली असता महामार्गावर एका टेम्पोचा गिअरबॉक्स बिघडल्याने तो रस्त्यावर उभा होता. अचानक समोर टेम्पो दिसल्याने चालक अमोल येरटे यांनी कार वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र वेगावर नियंत्रण न राहिल्याने कार आधी टेम्पोला धडकली आणि त्यानंतर तब्बल १५० फूट फरफटत जाऊन दुभाजकावर आदळली.

अपघात इतका भीषण होता की कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला. अमोल येरटे आणि शेखर सुरेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या कादर हंडेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारमधील एअरबॅग उघडल्या होत्या, मात्र धडकेची तीव्रता प्रचंड असल्याने त्याचा उपयोग झाला नाही.

घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेमुळे तिन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरभर शोककळा पसरली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!