Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘पैशांचा पाऊस पाडतो’ म्हणत लाखोंची फसवणूक; पंढरपुरात आणखी एका भोंदू बाबाला बेड्या

‘पैशांचा पाऊस पाडतो’ म्हणत लाखोंची फसवणूक; पंढरपुरात आणखी एका भोंदू बाबाला बेड्या

Pandharpur News : माढा तालुक्यातील आडेगाव येथे भोंदूगिरी करून लोकांची फसवणूक करणाऱ्या आणखी एका तथाकथित बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. गुरु माऊली उर्फ नाना महाराज वीरकर याच्यासह त्याचा भाऊ विकास वीरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मनोहर भोसले प्रकरणानंतर आता हे नवे प्रकरण समोर आल्याने माढा-पंढरपूर परिसरात भोंदूगिरीच्या प्रकारांबाबत संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आडेगाव येथे आश्रम उभारून नाना महाराज वीरकर अनेक वर्षांपासून जादूटोणा, भविष्य सांगणे आणि “व्यवसायात मोठा फायदा करून देतो” अशा आमिषांद्वारे लोकांना जाळ्यात ओढत होता. त्याच्याकडे काही प्रभावशाली व्यक्तींची ये-जा असल्याने त्याचा दबदबा वाढला होता.

पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 2024 पासून व्यवसायात भरभराट करून देण्याचे आश्वासन देत वीरकर याने त्याला “हे कासव घे, तुझ्याकडे पैशांचा पाऊस पडेल” असे सांगितले आणि मोठी रक्कम उकळली.

मात्र व्यवसाय वाढण्याऐवजी संबंधित तरुणावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. पीडिताने पाच लाखांहून अधिक फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. त्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात २ लाख ३५ हजार रुपयांच्या फसवणुकीची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना आडेगाव येथील आश्रमातून ताब्यात घेतले.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही पीडित समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!