Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा ‘एकला चलो रे’चा नारा

BMC Election 2025: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वतंत्रपणे मैदानात उतरून लढण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला आहे. मुंबई काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरात पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांनी याबाबत निर्णय जाहीर केला. मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही हा निर्णय पक्षाच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार घेतल्याचे सांगितले. आगामी बीएमसी निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडी किंवा इतर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

निवडणूक स्वबळावरच लढणार – वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले की, ‘मुंबईतील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका ठाम आहे, ही निवडणूक स्वबळावर लढली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यासोबत आमची युती कायम आहे आणि त्यांच्याशी पुढील चर्चा सुरू राहील.’ मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणतयारी वेगात सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यात वाढलेल्या संपर्कांमुळे नव्या राजकीय समीकरणांना वाव मिळाला आहे. मात्र काँग्रेसने मनसेला महाविकास आघाडीत सामील करण्यास सुरुवातीपासून विरोध दर्शविला होता. त्यामुळे मनसे-एमव्हीए आघाडीची शक्यता अनिश्चित झाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय चित्र अधिकच स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – मुंबईत राडा! ताज लँड्स हॉटेलबाहेर शिवसेना ठाकरे गट आणि भाजप समर्थकांमध्ये खडाजंगी

मनसेची आक्रमक तयारी

मनसेने बीएमसी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून 227 पैकी सुमारे 125 जागांसाठी उमेदवारांची यादी तयार केली आहे. या जागांमध्ये माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी यांसारख्या मराठी मतदारसंख्या जास्त असलेल्या प्रभागांचा समावेश आहे. युती झाल्यास मनसे आणि ठाकरे गटातील शिवसेनेमध्ये जागावाटप कसे होणार, याविषयी अद्याप स्पष्टता नाही. 11 नोव्हेंबरला आरक्षण जाहीर झाल्यानंतरच दोन्ही पक्षांमध्ये प्रत्यक्ष बैठका आणि जागावाटपातील सूत्रे ठरवली जाण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!