Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

राहुल गांधी यांच्याशी थेट संपर्क असलेले माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई: काँग्रेस पक्षाची नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली होती. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्यात येणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज (दि. १३) अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती केली आहे. याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नियुक्ती करण्यास देखील मंजुरी दिली आहे.

दरम्यान अखिल भारतीय काँग्रेस समितीने एक पत्रक जारी केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “काँग्रेस अध्यक्षांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. सध्याचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या योगदानाचे पक्ष कौतुक करतो. तसेच काँग्रेस अध्यक्षांनी महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून विजय नामदेवराव वडेट्टीवार यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने करण्यास मान्यता दिली आहे.

अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव राहिलेले सपकाळ हे राहुल गांधी यांचे खास निकटवर्तीय आहेत. ते बुलढाण्याचे आमदार आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिले आहेत. पक्ष संघटन वाढीसाठी पक्षाने विविध राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांची नेमणूक केली होती. गांधी घराण्याशी असलेली जवळीक आणि पक्षासाठी केलेले कार्य लक्षात घेता प्रदेशाध्यक्षपदाची माळ सपकाळ यांच्या गळ्यात पडली आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत पक्षाच्या हायकमांडकडे अनेक दिग्गज नेत्यांचे पर्याय उपलब्ध होते. यामध्ये कोल्हापूरचे नेते आणि आमदार सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार विश्वजीत कदम अशा अनेक दिग्गज नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होती. पण या सर्व नेत्यांपेक्षा बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हे वरचढ ठरल्याची सध्या चर्चा आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!