Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या नेत्यांचा हात, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या नेत्यांचा हात, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचे कॉल रेकॉर्ड्स सापडल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर साताऱ्यातील एका महिलेने छळ केल्याचा गंभीर आरोप केला होता. हे 2016 मधील प्रकरण असून गोरे यांनी स्वत:चे नग्न फोटो पाठवले असल्याचा आरोप महिलेने केला होता. यामुळे मंत्री असलेले गोरे हे चांगलेच चर्चेत आले होते. मात्र, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला एक कोटीची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. आता या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

आतापर्यंत या प्रकरणात चार तक्रारी झाल्या आहेत. संबंधित महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे, असा खोटा प्रचार करण्यात आला. या प्रकरणात तीन लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक महिला, दुसरा तुषार खरात आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सर्वांनी मिळून हा कट रचला. याप्रकरणी सर्व पुरावे सापडले आहेत. त्यांचे व्हॉट्सॲपवरचे संभाषण सापडले आहे. परंतु, दुर्दैवाची गोष्टी पुढची आहे की, या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक असल्याचे दिसून आले आहे. मी हे पुराव्यानिशी सांगत आहे. प्रभाकरराव देशमुख हे थेट तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत. मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आहेत, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. गोरे यांच्याविरुद्ध जे व्हिडिओ केले आहेत, ते व्हिडिओ त्यांनी सुळे आणि पवार यांना पाठवले आहेत. आता सर्व गोष्टींची चौकशी होणार आहे. हे नेमकं काय चाललं आहे. आपण सर्व राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!