पुणे: पुणे जिल्ह्यामधील दौंड शहरामध्ये बोरावलेनगर भागातील कचऱ्यात बरणीमध्ये सात ते आठ अर्भकांचे मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस समोर आली आहे. बोरावलेनगरमधील स्थानिक रहिवाशांनी ही माहिती पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत सात ते आठ अर्भकांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.
सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. अभर्कांचा मृतदेह कचऱ्यात फेकण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. हे सर्व अर्भक मुलींचे असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी याप्रकरणी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे, तसेच अधिकृत माहितीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


