Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बिहारमध्ये NDA चा प्रचंड विजय! फडणवीसांनी केलेल्या प्रचाराने केली कमाल

बिहारमध्ये NDA चा प्रचंड विजय! फडणवीसांनी केलेल्या प्रचाराने केली कमाल

Bihar election results 2025: बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या निकालाचे चित्र स्पष्ट होऊ लागले असून, दुपारी 12.30 वाजेपर्यंत सर्व 243 जागांचे कल समोर आले आहेत. प्रारंभिक आकडेवारीनुसार एनडीएने मोठी आघाडी घेत 189 जागांवर आगेकूच केली आहे, तर महागठबंधन 50 जागांवर आणि अन्य उमेदवार 4 जागांवर आघाडीवर आहेत. या निकालांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा लक्षणीय प्रभाव दिसत असल्याचे भाजपकडून सांगितले जात आहे.

फडणवीस यांनी ज्या बिहारमधील मतदारसंघांत प्रचार केला, त्या 61 जागांपैकी तब्बल 49 जागांवर एनडीएचे उमेदवार पुढे आहेत. 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी त्यांनी सात जिल्ह्यांमध्ये सभा आणि रॅली घेतल्या होत्या. त्यांच्या प्रचाराचा मोठा परिणाम निवडणुकीत उमटल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, बिहारमधील या यशाचा आनंद साजरा करण्याची तयारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात सुरू आहे.

हेही वाचा – बिहार निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; NCP चे सर्व उमेदवार पिछाडीवर

फडणवीस यांनी प्रचार केलेले जिल्हे

  • सारण – 10 पैकी 9 ठिकाणी एनडीए आघाडीवर
  • सिवान – 8 पैकी 6 जागांवर एनडीए आघाडी
  • पाटणा – 14 पैकी 11 मतदारसंघात एनडीए पुढे
  • मुझफ्फरपूर – 11 पैकी 10 जागांवर एनडीए आघाडी
  • सहरसा – 4 पैकी 3 जागांवर आघाडी
  • खगडिया – सर्व 4 मतदारसंघात एनडीए आघाडीवर
  • समस्तीपूर – 10 पैकी 6 जागांवर एनडीए आघाडी

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निकालामुळे एनडीएची ताकद आणखी वाढेल, असे सांगितले. केंद्र सरकार आधीच मजबूत आहे. बिहारचा हा निकाल एनडीएला अधिक घट्ट करणार आहे, असे ते म्हणाले. निवडणुकीनंतर आरोप-प्रत्यारोप होतील, पण पक्षाची एकजूट टिकून राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, निकाल येण्यापूर्वीच राहुल गांधी विदेशात गेल्याचे टोला त्यांनी लगावला. ईव्हीएम आणि मतदार याद्यांबाबत विरोधक पुन्हा संशय निर्माण करतील, असेही ते म्हणाले.

2020 च्या निवडणुकांचे निकाल

2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने 74, जेडीयूने 43, आरजेडीने 75, काँग्रेसने 19, एआयएमआयएमने 5, सीपीएम आणि सीपीआयने प्रत्येकी 2, तर बसपाने 1 जागा जिंकली होती.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!