Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

टी -ट्वेन्टीमध्ये निकोलस पूरनचे ६०० षटकार पूर्ण

टी -ट्वेन्टीमध्ये निकोलस पूरनचे ६०० षटकार पूर्ण

विशाखापट्टनम्: आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या सामन्यात लखनौकडून खेळताना निकोलस पूरनने ३० चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने टी -ट्वेन्टीमध्ये ६०० षटकार मारण्याचा विक्रम केला आहे.

या सामन्यापूर्वी पूरनने टी -ट्वेन्टी क्रिकेटमध्ये ५९९ षटकार मारले होते, पण या सामन्यात त्याने पहिला षटकार मारताच त्याच्या टी -ट्वेन्टी कारकिर्दीतील ६०० षटकार पूर्ण केले. ज्यामध्ये जगभरात खेळल्या जाणाऱ्या टी -ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय आणि लीगचा देखील समावेश आहे. या फॉरमॅटमध्ये ६०० षटकार मारणारा पूरन हा जगातील फक्त चौथा फलंदाज बनला आहे.

टी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ४६३ सामन्यांमध्ये १०५६ षटकार मारले आहेत. या फॉरमॅटमध्ये हजारांहून अधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आहे, ज्याने आतापर्यंत ६९५ सामन्यांमध्ये ९०८ षटकार मारले आहेत. या यादीत आंद्रे रसेल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ५३९ सामन्यांमध्ये ७३३ षटकार मारले आहेत. त्यानंतर येतो निकोलस पूरन. आतापर्यंत त्याने टी -ट्वेन्टी क्रिकेटमध्ये ३८५ सामने खेळले आहेत आणि ६०० हुन अधिक षटकार मारले आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!