Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

ती अंगणात खेळत होती, फुगा फुगवताना तोंडातच फुटला; श्वास कोंडल्याने 8 वर्षाच्या चिमुकलीने काही क्षणातच जीव गमावला

ती अंगणात खेळत होती, फुगा फुगवताना तोंडातच फुटला; श्वास कोंडल्याने 8 वर्षाच्या चिमुकलीने काही क्षणातच जीव गमावला

धुळे : घराच्या अंगणात खेळत असताना एका 8 वर्षीय चिमुकलीचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे. एक फुगा चिमुकली चिमुकलीचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरला असल्याची माहिती समोर आली. अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना तो तोंडातच फुटला. त्यानंतर श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाला. डिंपल वानखेडे असे 8 वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. यामुळे वानखेडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डिंपलच्या दुर्देवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

धुळे शहरातील यशवंत नगरमध्ये ही घटना घडली आहे. फुगा फुगवताना अचानकच तो तोंडातच तो फुटला. त्या फुग्याचे तुकडे डिंपलच्या श्वासनलिकेत अडकल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. तिला श्वास घेण्यास त्रास होत आहे, हे लक्षात येताच घरातील लोकांनी तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर, डॉक्टरांनी तपासून डिंपलला मृत घोषित केले. आपल्या अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना झालेल्या या दुर्घटनेत आठ वर्षीय डिंपल दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!