Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबई दुसऱ्यांदा बाजी मारणार की दिल्ली विजेतेपदाचा दुष्काळ संपविणार? डब्ल्यूपीएलच्या फायनलला थोड्याच वेळात सुरुवात होणार

मुंबई दुसऱ्यांदा बाजी मारणार की दिल्ली विजेतेपदाचा दुष्काळ संपविणार? डब्ल्यूपीएलच्या फायनलला थोड्याच वेळात सुरुवात होणार

मुंबई: महिला प्रीमिअर लीगचा तिसरा हंगाम संपण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. आज (दि. १५) या स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स व मुंबई इंडियंन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून दिल्ली विजेतेपदाचा दुष्काळ संपविणार की मुंबई दुसऱ्यांदा विजेतेपदाचा चषक उंचावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली मेग लँनिंग महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. ती व तिचा संघ पहिला डब्ल्यूपीएलचा किताब जिंकण्यासाठी आपल्याकडून कोणतीही कसर सोडणार नाही. दिल्लीच्या पुरुष संघालाही आतापर्यंत आयपीएलचे विजेतेपद जिंकण्यात अपयश आले आहे. दिल्लीच्या संघाने चांगल्या नेट रनरेटच्या आधारावर अंतिम फेरीत थेट प्रवेश केला आहे. तर मुंबईच्या संघाने एलिमिनिटेरमध्ये गुजरात जायंट्सला पराभूत करत विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे.

या सामन्यात दिल्ली आपल्या विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याच्या लक्ष्यासह मैदानावर उतरेल, तर मुंबईची नजर दुसऱ्यांदा चषक उंचावण्यावर असेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालीले संप डब्ल्यूपीएलच्या पहिल्या सत्रात विजेता ठरला होता. त्यांनी दिल्लीला पराभूत करत विजेतेपद आपल्या नावे केले होते, आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमने-सामने असणार आहेत.

एलिमिनेटर सामन्यात मुंबईची गुजरातवर मात

या स्पर्धेचा एलिमिनेटर सामना गुरुवारी मुंबई इंडियन्स व गुजरात जायंट्स यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर झाला. यामध्ये गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली यानंतर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना हिली मॅथ्यूज व नॅट सिव्हर बंट यांच्या प्रत्येकी ७७ धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ बाद २१३ धावा केल्या. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा डाव १९.२ षटकांत १६६ धावावर संपुष्टात आला व मुंबईने ४७ धावांनी हा सामना जिंकत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. गुजरातकडून गिब्सनने सर्वाधिक ३४ धावांचे योगदान दिले. तर मुंबईकडून मॅथ्यूजने ३१ धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक ३ गडी बाद केले. सामनावीरचा पुरस्कार हिली मॅथ्यूजला देण्यात आला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!