Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

धक्कादायक! पोलीस ठाण्यासमोर दगडाने ठेचून खून; रक्ताच्या थारोळ्यात पडून होता मृतदेह

धक्कादायक! पोलीस ठाण्यासमोर दगडाने ठेचून खून; रक्ताच्या थारोळ्यात पडून होता मृतदेह

लातूर: शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर संरक्षक भिंतीलगत शुक्रवारी (दि. १५) सकाळी एका अनोळखी व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अद्याप मयताची ओळख पटली नसून पोलीस त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरासह जिल्हाभरात खुनाच्या घटनांत वाढ झाली आहे, दरम्यान, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या समोर संरक्षक भिंतीलगत शुक्रवारी सकाळी एक वेडसर व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. मध्यरात्री किंवा पहाटे त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मयताची ओळख पटली नसून तो वेडसर असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार उघडकीस येताच शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहाणी केली. महिनाभरांपूर्वी बाभळगाव नाका परिसरात अशाच पध्दतीने एका भिकाऱ्याचा झोपण्याच्या जागेवरून खून करण्यात आला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!