Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कृषिमंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे….

कृषिमंत्री कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर ते अपात्र ठरू शकतात, त्यामुळे….

नाशिक: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयाने काही महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही, तर ते अपात्र ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशाचा खर्च होईल, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या केसचाही दाखला कोकाटेंच्या केसच्या निकालात विचारात घेण्यात आल्याची माहिती कोकाटे यांचे वकील अॅड. अविनाश भिडे यांनी दिली आहे.

कोकाटे हे गेल्या 35 वर्षांपासून जनेतेचा विश्वास संपादन करून निवडून येत आहेत. ते सध्या कॅबिनेटमंत्री असल्याने राज्यभर त्यांना काम करण्याची संधी आहे. जर त्याच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही, तर जनतेच्या सेवेची संधी मिळणार नाही. अपील जोपर्यंत सुरू आहे, अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत स्थगिती द्यावी, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता.

त्याचबरोबर कोकाटे यांनी 1989 मध्ये शासनाच्या सदनिकासाठी अर्ज दाखल केला होता. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 1992 नंतरचे उत्पन्न विचारात घेतले आहे. 1989ची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सिद्ध करता आले नसल्याचेही निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. त्यामुळे सर्व बाजूंचा विचार करून सत्र न्यायालयाने कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली असल्याची माहिती अॅड. अविनाश भिडे यांनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!