Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar : निवडणुकीच्या तोंडावरअजित पवारांना मोठा धक्का; तब्बल ४३ पदाधिकाऱ्यांचा एकाचवेळी राजीनामा

Ajit Pawar : निवडणुकीच्या तोंडावरअजित पवारांना मोठा धक्का; तब्बल ४३ पदाधिकाऱ्यांचा एकाचवेळी राजीनामा

Maharashtra Local Body Election News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात मोठा झटका बसला आहे. जिल्हा उपाध्यक्ष पठाण अहमद खान नजीर खान आणि अल्पसंख्यांक शहराध्यक्ष चांद खा यांच्यासह त्यांच्या ४३ कट्टर समर्थक पदाधिकाऱ्यांनी एकाचवेळी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांकडे राजीनामा दिला.

मानसन्मान मिळत नसल्याने आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाल्याच्या चर्चेने हे राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये उपजिल्हाध्यक्षांसह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत.

शहराध्यक्ष मोहम्मद इरफान आणि मोहम्मद फय्याज यांच्याकडे हे राजीनामे सुपूर्द करण्यात आले. या घटनेने पुसद शहरात राजकीय खळबळ माजली असून, निवडणुकांआधी अजित पवार गटाला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, शहराध्यक्षांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा पदभार वाढल्याने कामाचा व्याप वाढला आहे. ते सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालतात आणि समस्या सोडवतात. किरकोळ कारणांसाठी ते फिरू शकत नाहीत, वेळेअभावी फोनवर बोलणे शक्य नसते.

त्यांच्याविरोधात अपप्रचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यात लवकरच स्थानिक निवडणुका होण्याची शक्यता असताना हा प्रकार अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!