Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

नीरा भीमा कारखान्यामधून इथेनॉलचा पहिला टँकर ऑइल कंपन्यांच्या डेपोकडे रवाना

नीरा भीमा कारखान्यामधून इथेनॉलचा पहिला टँकर ऑइल कंपन्यांच्या डेपोकडे रवाना

इंदापूर: निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या चालु गळीत हंगामातील इथेनॉलचा पहिला टँकर ऑइल कंपन्यांच्या डेपोकडे मंगळवारी (दि.04) नोव्हेंबर रोजी रवाना करण्यात आला. याप्रसंगी पहिल्या टँकरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री व कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते शहाजीनगर (ता. इंदापूर ) येथे करण्यात आले.

निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चालू ऊस गळीत हंगामामध्ये इथेनॉल उत्पादनाचे सुमारे 1 कोटी 30 लाख लिटरचे उद्दिष्ट असल्याची माहिती याप्रसंगी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी दिली. तसेच कारखान्याच्या चालु गळीत हंगाम उत्कृष्टपणे सुरु झाला असून दररोज सुमारे 5500 मे. टन उसाचे गाळप केले जात आहे.

यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, अँड. कृष्णाजी यादव, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!