Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना प्रवीण तरडेंनी दिला मदतीचा हात; पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केलं ‘हे’ काम

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना प्रवीण तरडेंनी दिला मदतीचा हात; पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केलं ‘हे’ काम

पुणे: मराठवाड्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे उद्ध्वस्त केले आहे. पिकांसह घरं, संसार आणि स्वप्नं पाण्यात वाहून गेली. या आपत्तीनंतर अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. मात्र, या कठीण काळात अभिनेता प्रवीण तरडे हे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसाठी आधार बनले आहेत. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सुमारे 200 विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग खुला ठेवला आहे.

प्रवीण तरडे यांनी म्हटलं की, पूरामुळे शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पण या परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वप्न तुटू नयेत, म्हणून आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. शिक्षण हेच खरे शस्त्र आहे, आणि विद्यार्थ्यांनी कोणत्याही संकटाला न घाबरता आपले ध्येय गाठावे, हीच अपेक्षा आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना राहण्यासाठी लागणारे रूम भाडे, मेसचा खर्च, तसेच अभ्यासिकेच्या फी यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा – आस्मानी संकटात पिंपरी-चिंचवडकरांचा कायम ‘एक हात मदतीचा’; पूरग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 106 गायींचे दान

प्रवीण तरडे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांसाठी आणि विविध सामाजिक कारणांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. मात्र, या वेळी त्यांनी थेट विद्यार्थ्यांच्या भविष्याला हातभार लावला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, अशा संकटाच्या काळात आमच्यासाठी आधार बनलेले प्रवीण सर म्हणजे देवदूतच आहेत. त्यांच्या मदतीमुळे आमचे शिक्षण सुरू राहू शकले. प्रवीण तरडे यांच्या या उपक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही दिलासा मिळाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!