Today गुरूवार, 17th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘बिग बॉस 19’ मध्ये पुन्हा एकदा डबल एव्हिक्शन; निलम गिरीसोबत अभिषेक बजाज घराबाहेर

‘बिग बॉस 19’ मध्ये पुन्हा एकदा डबल एव्हिक्शन; निलम गिरीसोबत अभिषेक बजाज घराबाहेर

Bigg Boss 19: कॉमेडियन प्रणित मोरे डेंग्यूमधून बरा होऊन Bigg Boss 19 च्या घरात त्याचे पुनरागमन झाले आहे. गेल्या आठवड्यात घरामध्ये मोठा ड्रामा झाला आणि प्रणितला घारबाहेर पडावे लागले होते. अखेर त्याची पुन्हा एन्ट्री दाखवण्यात आली. मात्र, आता या आढवड्यात त्यांच्या ग्रुपमधीलच Bigg Boss 19 चा मोठा दावेदार मानला जाणाऱ्या सदस्याचे एव्हिक्शन झाले आहे. असे अपडेट समोर आले आहे की, कॉमेडियनच्या एका निर्णयामुळे ‘वीकेंड का वार’मध्ये सगळा खेळच पालटला आहे. पुन्हा एकदा सलमान खान एक नव्हे तर दोन स्पर्धकांना घराबाहेर पाठवेल, अशी चर्चा आहे.

सोशल मीडियावर विविध पेजद्वारे बिग बॉसमधील आतली बातमी दिली जाते. एपिसोड प्रसारित होण्यापूर्वी काही तपशील समोर येतो आणि असेच धक्कादायक अपडेट समोर आले आहे. ‘द खबरी’, ‘बिग बॉस तक’ या काही एक्स या प्लॅटफॉर्मवरील पेजवर अशी माहिती देण्यात आली आहे की, या आठवड्यात नीलम गिरी आणि अभिषेक बजाज यांचे एव्हिक्शन होईल. म्हणजे बसीर आणि नेहलनंतर पुन्हा एकदा धक्कादायक असे डबल एलिमिनेशन पाहायला मिळेल.

वीकेंड का वार’बद्दल अशी माहिती समोर आली आहे की, प्रणित गेल्या आठवड्यात घराचा कॅप्टन झाला होता, पण त्याला कॅप्टन्सी पूर्ण करण्याआधीच तब्येतीच्या कारणास्तव घराबाहेर जावे लागलेले. आता सलमानने त्याला विशेष अधिकार दिला की, तो नॉमिनेट झालेल्या कोणत्याही एका स्पर्धकाला वाचवू शकतो. सलमानने याआधीच असे जाहीर केलेले की, फरहाना भट्ट आणि गौरव खन्ना सुरक्षित आहे. विशेष अधिकार मिळाल्यानंतर प्रणित अशनूर कौरला वाचवतो. परिणामी नीलम आणि अभिषेकला घराबाहेर जावे लागले, अशी चर्चा आहे.

सोशल मीडियावर नीलम यावेळी घराबाहेर जाईल अशी चर्चा होतीच, पण अभिषेकचे एव्हिक्शन अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे. शिवाय अशनूर-अभिषेकची जोडी तुटल्यानेही चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!