Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

आईच्या मृत्यूनंतर राग अनावर! रुग्णाच्या नातलगाचा कूपर रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला

आईच्या मृत्यूनंतर राग अनावर! रुग्णाच्या नातलगाचा कूपर रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला

Cooper Hospital Attack: शहरातील विलेपार्ले (पश्चिम) येथील कूपर रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आईच्या मृत्यूनंतर संतापलेल्या ३५ वर्षीय समीर अब्दुल जब्बार शेख या व्यक्तीने तीन डॉक्टरांवर शिवीगाळ आणि शारीरिक हल्ला केला. या प्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर समीर शेख आपल्या ५७ वर्षीय आई सईदा शेख यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात घेऊन आला. डॉक्टरांनी तपासणी केली असता रुग्णाची हृदयगती आणि रक्तदाब दोन्ही बंद झाल्याचे आढळले. डॉ. गौरव आनंदगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) सुरू केले. मात्र, सततच्या प्रयत्नांनंतरही रुग्णाला वाचवता आले नाही. आईचा मृत्यू झाल्याचे सांगताच संतापलेल्या समीरने डॉक्टरांना धमक्या देत मारहाण केली. या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

हेही वाचा – Parth Pawar Land Scam : ३०० कोटी घेऊन शीतल तेजवानी नवऱ्यासह फरार?; पुणे पोलिसांकडून शोधाशोध

जुहू पोलिसांनी आरोपी समीर शेखवर महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन्स कायदा, २०१० नुसार, गुन्हा दाखल केला आहे. तथापी, सेंट्रल MARD आणि BMC MARD यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “हा अमानुष हल्ला सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या असुरक्षित परिस्थितीची जाणीव करून देतो.”

रुग्णालयातील सेवा ठप्प होण्याची शक्यता

MARD ने आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच निष्काळजी सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित करून अपघात, ICU आणि OBGY वॉर्डमध्ये प्रशिक्षित, सशस्त्र सुरक्षारक्षकांची कायम तैनाती करावी, अशी मागणी केली आहे. MARD ने प्रशासनाला सोमवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मागण्या मान्य करण्याची मुदत दिली आहे. अन्यथा, KEM, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयातील डॉक्टर आपत्कालीन सेवा बंद ठेवून सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, डॉक्टरांसाठी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!