Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार, रणजी स्पर्धेत मेघालयाच्या ‘या’ युवा खेळाडूची जोरदार फटकेबाजी; BCCI कडून व्हिडिओ शेअर

6,6,6,6,6,6,6,6..सलग 8 षटकार, रणजी स्पर्धेत मेघालयाच्या ‘या’ युवा खेळाडूची जोरदार फटकेबाजी; BCCI कडून व्हिडिओ शेअर

सूरत: देशात सध्या बीसीसीआयच्या रणजी स्पर्धा सुरु आहेत. रणजी स्पर्धेत देशातील विविध राज्यातील क्रिकेट बोर्डांचे संघ सहभागी होतात. मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यात रणजी मॅच सुरु आहे. रणजी ट्रॉफी प्लेट ग्रुप मॅच दरम्यान मेघालयच्या आकाश कुमार चौधरी यानं विक्रमी कामगिरी केली आहे. आकाश कुमार चौधरीनं प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक वेगवान अर्धशतक झळकावलं आहे. आकाश चौधरीनं या खेळीदरम्यान सलग 8 षटकार मारले. त्यानं केवळ 11 बॉलमध्ये अर्धशतक केलं.

आकाश कुमार चौधरीचं वेगवान अर्धशतक

मेघालय आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील मॅच सूरतच्या पिठवाला स्टेडियमवर सुरु आहे. आकाश कुमार चौधरीनं 11 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. आकाशच्या आक्रमक फलंदाजीनंतर मेघालयनं त्यांचा पहिला डाव 6 बाद 628 वर घोषित केला. आकाश कुमार चौधरीनं वेन व्हाइट याचा विक्रम मोडला. व्हाइटनं यापूर्वी 2012 मध्ये एसेक्स विरुद्ध लीस्टरेशायरकडून खेळताना 12 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या. मेघालयनं संघ जाहीर केला तेव्हा आकाश कुमार चौधरीच्या धावा 14 बॉल 50 इतक्या होत्या. आकाश कुमार चौधरीनं सलग 8 षटकार मारले. आकाश कुमार चौधरीनं 126 व्या ओव्हरमध्ये 6 बॉलवर 6 सिक्स मारले. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये सलग दोन बॉलवर षटकार मारले.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील एका ओव्हरमध्ये सहा षटकार मारण्याची ही दुसरी वेळ आहे. रवी शास्त्री यांनी 1984-98 मध्ये तिलक राज विरुद्ध सहा षटकार मारले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही तिसरी वेळ आहे, ज्यामध्ये एखाद्या खेळाडूनं सलग 6 षटकार मारलेत. दरम्यान, मेघालयनं पहिल्या डावात अर्पित भटेवार यांच्या 207 धावांच्या जोरावर अरुणाचल प्रदेश समोर धावांचा डोंगर उभा केला आहे. अर्पित भटेवरानं 23 चौकार आणि 4 षटकार मारले. राहुल दलाल आणि कॅप्टन किशन लिंगदोह यांनी देखील शतकी खेळी केली. मेघालयनं 6 बाद 628 धावांवर डाव घोषित केला. अरुणाचल प्रदेश या मॅचमध्ये पराभवाच्या छायेत आहे. त्यांचा पहिला डाव 73 धावांवर आटोपला. फॉलोऑन नंतर दुसऱ्या डावात अरुणाचल प्रदेशनं 3 बाद 29 धावा केल्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक

आकाश कुमार चौधरीनं 11 बॉलमध्ये 50 धावा केल्या आहेत. त्यापूर्वी वेन व्हाइट यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12 बॉलमध्ये लीसेस्टरशायर विरुद्ध 2012 मध्ये अर्धशतक केलं होतं. वॅन वुरेन यानं 13 बॉलमध्ये, नेड एकर्सली यानं 14 बॉलमध्ये, खालिद महमूद यानं 15 बॉलमध्ये तर बनदिप सिंग यानं 15 बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 बॉलमध्ये अर्धशतक केलं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!