Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Bomb Threat: मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवणार, दिल्ली स्फोटानंतरच्या धमकीने खळबळ

Bomb Threat: मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवणार, दिल्ली स्फोटानंतरच्या धमकीने खळबळ

मुंबई: दिल्लीतील बॉम्बस्फोटाने संपूर्ण देशात हादरला असतानाच देशातील 5 विमानतळे बाँम्बने उडवून देणार असल्याची धमकी मिळाली आहे. इंडिगो एअरलाइन्सला आज दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, त्रिवेंद्रम आणि हैदराबाद या पाच विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दिल्ली बॉम्बस्फोटाचे प्रकरण ताजे असताना आता देशातील 5 विमानतळांना उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर आता सगळीकडे खळबळ उडाली असून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र हा मेल कुणी आणि कुठून पाठवला हे अद्याप समजू शकलेले नाही.

एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट उडवण्याचीही धमकी

मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. त्यामुळे वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला. या विमानाचे तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, त्यानंतर बॉम्ब निकामी पथकाने विमानाची कसून तपासणी केली. मात्र यात आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही.

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर हाय अलर्ट

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर देशातील बहुतेक विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. विमानतळांच्या आत आणि बाहेर सीआयएसएफ आणि विमानतळ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. श्वान पथके आणि बॉम्ब निकामी पथकांनाही सतर्क ठेवण्यात आले आहेत. कोणताही धोका टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!