Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rituraj Gaikwad CSK Captain: ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेच्या कर्णधार पदाची सूत्रे; रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी पहा

Rituraj Gaikwad CSK Captain: ऋतुराज गायकवाडकडे सीएसकेच्या कर्णधार पदाची सूत्रे; रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी पहा

नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्जनेही त्यांचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाडला कायम ठेवले आहे. चेन्नईने रिटेन्शन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर लगेचच कर्णधाराबाबत घोषणा केली आहे. 2026 च्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसन खरेदी केले. त्यानंतर सीएसकेचा कर्णधारपद स्वीकारू शकतो अशा अफवा पसरल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडिया पोस्टद्वारे पुष्टी केली की ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करेल.

गेल्या हंगामात दुखापतीमुळे बाहेर

2024ला संघाने ऋतुराज गायकवाडकडे चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधार पदाची धूरा सोपवली होती. मात्र,त्यावेळी संघ काही चांगली कामदिरी करू शकला नाही. त्यानंतर, 2025 सा सुद्धा त्याच्याकडेच संघाचे नेतृत्व सुरू ठेवले. तथापि, दुखापतीमुळे त्याला 2025 च्या हंगाम मध्यात सोडावा लागला. त्यानंतर, कर्णधारपद एमएस धोनीकडे देण्यात आले. आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात धोनीने संघाचे नेतृत्व केले.

गायकवाडची आयपीएल कामगिरी

आयपीएल 2025 मध्ये सीएसकेची कामगिरी निराशाजनक होती, संघाची सुरुवात मंदावल्यानंतर एमएस धोनीही चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच, सीएसके 2025 ला गुणतालीकेत तळाशी होता. 2020 मध्ये ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून, ऋतुराज गायकवाडने 71 सामन्यांमध्ये 40.35 च्या सरासरीने आणि 17.47 च्या स्ट्राईक रेटने 2502 धावा केल्या आहेत.

चेन्नई सुपर किंग्सचे रिटेन खेळाडू

ऋतुराज गायकवाड, आयुष म्हात्रे, डेव्हाल्ड ब्रेव्हिस, एमएस धोनी, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हर्टन, गुरजानप्रीत सिंह, नाथन एलिस, रामकृष्ण घोष, श्रेयस गोपाल, नूर अहमद, मुकेश चौधरी, खलील अहमद, संजू सॅमसन (ट्रेड), अंशुल कंबोज.

चेन्नई सुपर किंग्सचे रिलीज खेळाडू

राहुल त्रिपाठी, वंश बेदी, सी आंद्रे सिद्धार्थ, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉन्वे, रवींद्र जडेजा (ट्रेड), सॅम करन (ट्रेड), दीपक हुड्डा, विजय शंकर, शेख रशीद, कमलेश नागरकोटी, मथीशा पथिराना.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!