Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सांगोल्यात एकाच कुटुंबातील दोन पिढ्या थेट रिंगणात; आजोबा नगराध्यक्षपदी, तर नातू नगरसेवक पदासाठी मैदानात

सांगोल्यात एकाच कुटुंबातील दोन पिढ्या थेट रिंगणात; आजोबा नगराध्यक्षपदी, तर नातू नगरसेवक पदासाठी मैदानात

सांगोला (जि. सोलापूर) : सांगोला नगरपालिका निवडणुकीत यंदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी अनोखी स्पर्धा रंगली आहे. एकाच कुटुंबातील दोन पिढ्या थेट रिंगणात उतरल्या आहेत. ७३ वर्षीय ज्येष्ठ नेते मारुती आबा बनकर नगराध्यक्षपदासाठी तर त्यांचा नातू २१ वर्षीय ज्योतिरादित्य बनकर प्रभाग क्र. ५ मधून नगरसेवकपदासाठी मैदानात आहे. भाजपच्या तिकीटावर दोघेही निवडणूक लढवत असल्याने ही जोडी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

मारुती आबा बनकर हे भाजपचे सर्वात ज्येष्ठ उमेदवार आहेत. त्यांनी पूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) तिकिटावर दोन वेळा सांगोल्याचे नगराध्यक्षपद भूषवले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शेकाप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केली. त्याचवेळी त्यांचा नातू ज्योतिरादित्य हा भाजपचाच सर्वात कमी वयाचा उमेदवार ठरला आहे.

शहाजी बापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजपची रणनीती

सध्या सांगोला नगरपालिकेत शिंदेसेनेची सत्ता आहे. माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना रोखण्यासाठी भाजपने महायुतीतील मित्रपक्ष शिंदेसेनेशी युतीचे प्रस्ताव नाकारले आणि थेट शेकापशी हातमिळवणी केली. एवढेच नव्हे तर शेकापचे ज्येष्ठ नेते मारुती आबा बनकर यांचा पक्षात प्रवेश घडवून त्यांनाच नगराध्यक्षपदाचा उमेदवार बनवले. या प्रवेशासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हेलिकॉप्टरने सांगोल्यात हजेरी लावली होती.

शहाजी बापूंची संतप्त प्रतिक्रिया

“गेली ५५ वर्षे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे आज झटक्यात भाजपमध्ये गेले. यामुळे स्वर्गीय गणपतरावांच्या आत्म्यास किती क्लेश होत असेल!” अशी खरमरीत टीका शहाजी बापू पाटील यांनी केली. तसेच पुढे म्हणाले, “आता सोंग बंद करा. गणपतरावांचा विचार सोडणाऱ्यांनी त्यांचा फोटो वापरू नये, समाधीला जाण्याचा अधिकारही त्यांनी गमावला आहे. आता त्या समाधीची जबाबदारी मी घेईन.”

सांगोला नगरपालिकेत आजोबा-नातू एकाच पक्षाच्या चिन्हावर लढताना दिसतील, हीच या निवडणुकीची सर्वात रंगदार आणि चर्चेची बाब ठरली आहे. निकाल कुणाच्या बाजूने लागतो, हे पाहण्यासाठी सांगोलावासीयांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे!

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!