नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहेत. त्यात काही फोनमध्ये बेस्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र, अनेक फोन बजेटच्या बाहेर असल्याचे दिसत आहे. असे असताना आता Vivo ने दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये 200MP कॅमेरासह अनेक बेस्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
Vivo ने फ्लॅगशिप फोन ivo X300 आणि Vivo X300 Pro भारतीय बाजारात लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन आधीच चिनी बाजारात लाँच झाले असतील. या सीरीजमध्ये OLED डिस्प्ले, २०० मेगापिक्सेल कॅमेरा आणि डायमेन्सिटी ९५०० प्रोसेसर सारखे फीचर्स मिळत आहेत. या ब्रँडची ही सीरीज कॅमेऱ्यावर केंद्रित आहे. प्रो सीरीजसह, ब्रँडने Zeiss अटॅचमेंट लाँच केले आहे जे कॅमेरा क्षमता वाढवते. याद्वारे, तुम्ही फोनमधून DSLR सारखे फोटो क्लिक करू शकता. Vivo X300 मध्ये १२०Hz रिफ्रेश रेट सपोर्ट आणि ४५०० निट्सची पीक ब्राइटनेस असलेला ६.३१-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
Vivo चा हा फोन डायमेन्सिटी ९५०० प्रोसेसरने ऑपरेट होतो. या फोनमध्ये 12GB आणि 16GB RAM पर्याय देण्यात आले आहेत. तर ५१२GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. या फोनमध्ये २०० एमपी + ५० एमपी + ५० एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने फ्रंटला ५० एमपी सेल्फी कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आहे.


