Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोलापूरमध्ये तृतीयपंथीय तरुणाची आत्महत्या; प्रियकराच्या हळदीच्या दिवशीच घेतला गळफास, व्हिडीओ नातेवाईकांना पाठवला

सोलापूरमध्ये तृतीयपंथीय तरुणाची आत्महत्या; प्रियकराच्या हळदीच्या दिवशीच घेतला गळफास, व्हिडीओ नातेवाईकांना पाठवला

सोलापूर : सोलापुरातून काल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराने दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवल्याच्या धक्क्यात तृतीयपंथी तरुण प्रकाश उर्फ व्यंकप्पा कोळी (वय २२, रा. बाळे, साईनगर) याने काल (गुरुवार, ४ डिसेंबर) सकाळी ९ वाजता भाड्याच्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, हा दिवस त्याच्या प्रियकर सुजित जमादारच्या हळदीचा होता.

आत्महत्येपूर्वी प्रकाशने एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ रेकॉर्ड करून नातेवाईकांना पाठवला होता. त्यात तो म्हणतो, “मी हे टोकाचं पाऊल उचलत आहे, याला फक्त सुजित जबाबदार आहे. त्याने माझ्याशी लग्न केलं, ८ वर्ष सोबत राहिलो.

माझ्या जोगती समाजापासून दूर नेलं, घर थाटलं, आता दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय. मला फसवलं, पैसै आणि सोनं घेतलं. माझा जीव घेण्याची वेळ त्यानेच्या या फसवणुकीमुळे आली.” व्हिडीओ मिळाल्यानंतर नातेवाइकांनी प्रकाशला बेशुद्धावस्थेत छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तपासताच मृत घोषित केले.

प्रकाशचा भाऊ नागेश कोळी याने सांगितले की, “दीड-दोन वर्षांपूर्वी प्रकाश आणि सुजित यांचं लग्न झालं होतं. लग्नाचा व्हिडीओही आमच्याकडे आहे. सुजितने ‘आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन, दुसरं लग्न करणार नाही’ अशी शपथ घेतली होती. मात्र नंतर भांडणे वाढली. पाच महिने आधी प्रकाशने बाळ्यात स्वतंत्र खोली घेतली, तरी सुजित तिथे येत राहिला. आता त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवलं आणि प्रकाशला सोडून दिलं.”

प्रकाश हा पाच भावंडांमध्ये चौथा होता. लहानपणापासूनच तो मुलींसारखा वागायचा, म्हणून जोगती समाजात सामील झाला होता. त्याचे नाव स्विटी असे ठेवण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच सोलापूरमधील तृतीयपंथी समाज मोठ्या संख्येने रुग्णालयाबाहेर जमला. त्यांनी सुजितवर कठोर कारवाईची मागणी केली.

फौजदार चावडी पोलिसांनी सुजित अप्पासाहेब जमादार (रा. वैद्यवाडी, प्रियंका चौक) याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (भादंवि कलम ३०६) गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. प्रकाशचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, व्हिडीओ कधी रेकॉर्ड केला याचा तपास सुरू आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तृतीयपंथी समाजात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “आमच्या भावाला फसवणूक करून जीव घ्यायला भाग पाडलं,” अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!