Today सोमवार, 15th जून 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gauri Garje Death Case: गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पती अनंत गर्जेला पुन्हा अटक

Gauri Garje Death Case: गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पती अनंत गर्जेला पुन्हा अटक

Gauri Garje Death Case: गौरी गर्जे मृत्यू प्रकरण उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांत वरळी पोलिसांनी मुख्य संशयित अनंत गर्जे याला ताब्यात घेतले होते. त्या अटकेनंतर त्याला प्रथम पोलीस कोठडीत आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात अद्यापही त्याला जामीन मंजूर झालेला नाही.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) अनंत गर्जेला पुन्हा अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, एसआयटीच्या चौकशीतून आणखी कोणती धक्कादायक माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा –गौरी पालवे प्रकरणात नवा ट्विस्ट! अनंत गर्जेची एक्स गर्लफ्रेंड आली समोर; गर्भपाताच्या कागदांबाबत पोलिसांना दिला जबाब

एसआयटीकडून होणाऱ्या तपासात अनंत गर्जेच्या भूमिकेसह त्याच्या संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि घटनेपूर्वी व नंतरच्या हालचालींची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मोबाईल कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे पुन्हा तपासले जाणार असून, या प्रकरणात आणखी आरोपी किंवा कटाचा धागा उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!