PMC Eletion : पुणे महानगरपालिका (PMC) निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. इतर राजकीय पक्ष उमेदवारांच्या मुलाखती घेत असतानाच आम आदमी पार्टी (AAP) ने २५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपविरोधात महाविकास आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गट) एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच ‘आप’ने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
‘आप’चे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सोशल मीडियावर ही यादी प्रसिद्ध केली. ते म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या PMC निवडणुकीत प्रशासकीय राजवटीत मनमानी आणि बेबंदशाही पुणेकरांनी अनुभवली. प्रस्थापित पक्षांमधील सत्तालोभासाठी युती-तोडफोड पाहिली. पुणे हे सांस्कृतिक-शैक्षणिक शहर असताना आता गुन्हेगारी आणि अपघातांचे शहर बनले आहे. पुणेकरांना बदल हवा आहे आणि आम आदमी पार्टी हा पर्याय उपलब्ध करून देणार आहे.”
किर्दत पुढे म्हणाले, “आम्ही पुण्यात स्वतंत्रपणे निवडणुका लढवू. प्रचारात वाहतूक कोंडी, आरोग्य सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि भयमुक्त पुणे या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल.”
जाहीर झालेली पहिली यादी (उमेदवार, प्रभाग आणि आरक्षण)
उमेदवार प्रभाग आरक्षण प्रवर्ग
शितल कांडेलकर: प्रभाग ३ (अ) ओबीसी महिला
संतोष काळे : प्रभाग 5 (अ) ओबीसी सर्वसाधारण
श्रद्धा शेट्टी : प्रभाग 6 (अ) अनुसूचित जाती
शंकर थोरात : प्रभाग 7 (ड) सर्वसाधारण
विकास चव्हाण : प्रभाग 8 (अ) अनुसूचित जाती
अँन अनिश : प्रभाग 8 (क) सर्वसाधारण महिला
सुदर्शन जगदाळे : प्रभाग 9 (ड) सर्वसाधारण
आरती करंजावणे: प्रभाग 10 सर्वसाधारण महिला
अॅड. कुणाल घाटे : प्रभाग 10 (ड) सर्वसाधारण
अॅड. दत्तात्रय भांगे :- प्रभाग 11 (ड) सर्वसाधारण
समीर आरवडे : प्रभाग 19 (क) सर्वसाधारण
मधू किरण कांबळे : प्रभाग 22 (अ) अनुसूचित जाती महिला
उमेश बागडे:- प्रभाग 23 (क) अनुसूचित जाती
विजया किरण कद्रे प्रभाग 23 (ब) ओबीसी महिला
निरंजन अडागळे: प्रभाग 26 (अ) अनुसूचित जाती
अनिल कोंढाळकरः प्रभाग 27 (ड) सर्वसाधारण
अॅड.अमोल काळे : प्रभाग 31 (ड) सर्वसाधारण
निलेश वांजळे प्रभाग 32 (ड) सर्वसाधारण
सुरेखा भोसले:- प्रभाग 32 (क) सर्वसाधारण महिला
रमेश मते : प्रभाग 33 (ड) सर्वसाधारण
धनंजय बेनकर प्रभाग 34 (अ) ओबीसी सर्वसाधारण
कुमार धोंगडे : प्रभाग 39 (ड) सर्वसाधारण
गजानन भोसले: प्रभाग 40 (ड) सर्वसाधारण
प्रिया निलेश कांबळे: प्रभाग 14 (अ) अनुसूचित जाती महिला
प्रशांत कांबळे प्रभाग 38(इ) सर्वसाधारण
‘आप’च्या या निर्णयामुळे पुणे महापालिका निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे. उर्वरित उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले.


