Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्र हळहळला..! संसाराची स्वप्नं अपुरीच राहिली; 10 दिवसांतच नवदाम्पत्याचा दुर्दैवी अंत

महाराष्ट्र हळहळला..! संसाराची स्वप्नं अपुरीच राहिली; 10 दिवसांतच नवदाम्पत्याचा दुर्दैवी अंत

Satara Accident : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हृदयद्रावक अपघातात नवविवाहित जोडप्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली.

सडादाढोली येथील राजू झोरे (२५) आणि राणी झोरे (२३) यांचे लग्न अवघ्या दहा दिवसांपूर्वी झाले होते. संसाराची स्वप्ने डोळ्यांत घेऊन दोघेही दुचाकीवरून घराबाहेर पडले होते. मात्र, हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील शेवटचा ठरला.

येरफळे गावाच्या हद्दीत त्यांनी पुढे जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेमुळे झोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. राज्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!