Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Crime News: IRS अधिकाऱ्याच्या मुलीची चार्जरच्या केबलने गळा आवळून हत्या; उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा थरार

Crime News: IRS अधिकाऱ्याच्या मुलीची चार्जरच्या केबलने गळा आवळून हत्या; उच्चभ्रू सोसायटीत भरदिवसा थरार

Crime News: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील ‘अमर कॉलनी’ या उच्चभ्रू परिसरात एका 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत तरुणी ही 1997 च्या तुकडीतील एका आयआरएस (IRS – Customs) अधिकाऱ्याची मुलगी असून, ती अभियांत्रिकी पदवीधर होती. आरोपीने मोबाईल फोन चार्जरच्या केबलने गळा आवळून तिचा खून केला. हत्येपूर्वी पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, अंतिम निष्कर्ष शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल.

घरात एकटी असताना साधला डाव
ही धक्कादायक घटना सकाळी 6:30 ते 7:30 या वेळेत घडली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा पीडितेचे आई-वडील सकाळी व्यायामासाठी जिममध्ये गेले होते आणि तरुणी घरात एकटीच होती. पीडित तरुणी UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती. भरवस्तीत आणि पॉश निवासी भागात ही घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

माजी घरकाम करणाऱ्या नोकरावर संशयाची सुई
या प्रकरणात पोलिसांनी ‘राहुल’ नावाच्या एका माजी घरकाम करणाऱ्या नोकरावर संशय व्यक्त केला आहे. राहुल हा मूळचा राजस्थानचा रहिवासी असून त्याने या कुटुंबाकडे सुमारे 8 महिने काम केले होते. विशेष म्हणजे, पैशांच्या अफरातफरीच्या कारणावरून त्याला केवळ दीड महिन्यापूर्वीच कामावरून काढून टाकण्यात आले होते. आरोपीला कुटुंबाच्या दिनचर्येची पूर्ण माहिती असल्याने त्याने ही वेळ साधली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक तर्क आहे.

चोरी आणि सूडाच्या भावनेतून गुन्हा?
आरोपी राहुल हा खरेदी करताना पैशांची चोरी करत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले होते. कामावरून काढल्याचा राग आणि घरातील मौल्यवान वस्तूंवर डोळा ठेवून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांना दाट संशय आहे. घटनेनंतर घरातून काही मौल्यवान ऐवज गायब आहे का, याचाही तपास सध्या सुरू आहे. या प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!