Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

थरारक घटना..! नवऱ्याने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळलं, उपचारादरम्यान मृत्यू

थरारक घटना..! नवऱ्याने पेट्रोल टाकून पत्नीला जिवंत जाळलं, उपचारादरम्यान मृत्यू

Solapur Crime : सोलापुर शहरात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नर्गिस फैजान शेख या महिलेवर तिच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून पैशां आणि दागिन्यांसाठी छळ केला जात होता. काही दिवसांपूर्वी तिच्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची घटना समोर आली होती. गंभीर भाजलेल्या नर्गिसचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नर्गिस आणि आरोपी फैजान यांचा विवाह अवघ्या आठ महिन्यांपूर्वी झाला होता. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच तिचा छळ सुरू झाला. किरकोळ कारणांवरून मारहाण आणि पैशांसाठी दबाव टाकला जात होता. या त्रासाला कंटाळून नर्गिस माहेरी राहायला गेली होती.

१५ एप्रिलच्या रात्री आरोपी पती तिच्या माहेरी गेला. “एकांतात बोलायचे आहे” असे सांगून त्याने नर्गिसला खोलीत नेले आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर तिच्यावर पेट्रोल ओतून लायटरने आग लावल्याचा आरोप आहे.

या घटनेत नर्गिस गंभीररीत्या भाजली होती. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या प्रकरणी विजापूर नका पोलीस स्टेशन येथे सुरुवातीला जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नर्गिसच्या मृत्यूनंतर आता हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात संताप आणि खळबळ पसरली आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!