Today गुरूवार, 5th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Beed News : बीडमध्ये राष्ट्रवादी नेत्यावर प्राणघातक हल्ला! कोयत्याने सपासप वार; परिसरात खळबळ

Beed News : बीडमध्ये राष्ट्रवादी नेत्यावर प्राणघातक हल्ला! कोयत्याने सपासप वार; परिसरात खळबळ

Beed News : बीड जिल्ह्यातील परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते संजय जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती असलेल्या जाधव यांच्यावर ५ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले.

या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जाधव हे गोवर्धन हिवरा ते सिरसाळा रोडवरील शेतातून घराकडे परतत असताना ही घटना घडली.

गोवर्धन शिवारात दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना अडवत अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या या हल्ल्यात त्यांच्या डोक्यासह शरीरावर अनेक वार करण्यात आले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, परळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!