Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

MLC Election : विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांचे ‘धक्कातंत्र’? पुणे-पिंपरीत ताकद वाढवण्यासाठी माजी आमदारांना संधी?

MLC Election : विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांचे ‘धक्कातंत्र’? पुणे-पिंपरीत ताकद वाढवण्यासाठी माजी आमदारांना संधी?

MLC Election : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. ९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत पक्षाच्या वाट्याला केवळ एक जागा येत असल्याने कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कोणता निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची घसरलेली ताकद पुन्हा वाढवण्यासाठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यासाठी या भागातील नेत्याला विधान परिषदेत संधी देण्याचा पर्याय विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे.

पुण्यातून माजी आमदार सुनील टिंगरे यांचे नाव चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देऊन वडगाव शेरी मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे संकेत आहेत. दरम्यान, त्या मतदारसंघातील सध्याचे आमदार बापूसाहेब पाठारे यांच्या राजकीय समीकरणांमुळेही या चर्चेला वेग आला आहे.

पिंपरी-चिंचवडमधूनही काही नावांची चर्चा रंगली आहे. योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे यांची नावे पुढे येत आहेत. बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपची वाढती ताकद लक्षात घेता या भागात पक्ष मजबूत करण्यासाठी योग्य उमेदवाराची निवड महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, पक्षात सुनील तटकरे यांच्या गटाच्या हालचाली वाढल्याचीही चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे निकटवर्तीय अमोल मिटकरी यांचे नावही पुन्हा उमेदवारीसाठी पुढे येत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाची बाजू ठामपणे मांडल्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळू शकते, असे बोलले जात आहे.

या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण रंगले असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!