Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Manikrao Kokate: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनचं अटक करणार? नाशिक पोलिसांच्या हालचालींना वेग

Manikrao Kokate: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनचं अटक करणार? नाशिक पोलिसांच्या हालचालींना वेग

Manikrao Kokate: गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. १९९५ च्या बहुचर्चित शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासमोरील कायदेशीर पेच अधिकच गडद झाला आहे. जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची सक्तमजुरी कायम ठेवल्यानंतर, कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी आता कंबर कसली आहे.

कोकाटेंना लीलावतीमधूनच ताब्यात घेणार?

आमदार माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे पोलीस त्यांना रुग्णालयातूनच बेड्या ठोकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या संपूर्ण प्रकरणाचा तातडीने आढावा घेतला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. कोकाटेंची प्रकृती नेमकी कशी आहे, यावर डॉक्टरांचे मत आणि कायदेशीर तांत्रिक बाबी तपासून पोलीस आपली पुढची पावले उचणार आहेत.

हेही वाचा – Manikrao Kokate: आता टप्प्या-टप्प्याने… कोकाटेंचं खातं काढताच भाजपाची भूमिका समोर; मोठी अपडेट समोर

बंधू विजय कोकाटे अद्याप फरार

या प्रकरणात केवळ माणिकरावच नव्हे, तर त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. कोर्टाने दोघांविरुद्धही वॉरंट काढले असले, तरी विजय कोकाटे यांचा सध्या कोणताही थांगपत्ता लागत नसल्याचे समजते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, विविध ठिकाणी धाडी टाकल्या जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

दरम्यान, १९९५ मध्ये बनावट कागदपत्रे तयार करून सरकारी सदनिका हडपल्याचा ठपका कोकाटे बंधूंवर ठेवण्यात आला आहे. या फसवणुकीच्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्याने त्यांना आता तातडीने शरण जाणे किंवा अटकेला सामोरे जाणे अपरिहार्य झाले आहे. रुग्णालयातील उपचार आणि कायदेशीर पळवाटांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त आता काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!