नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहेत. त्यात OnePlus ने भारतीय बाजारात नवीन स्मार्टफोन आणि टॅब्लेट लाँच केले आहेत. कंपनीने OnePlus 15R आणि OnePlus Pad Go 2 लाँच केले आहेत. दोन्ही फोन्स दमदार फीचर्ससह मिळत आहेत. OnePlus 15R मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर आहे आणि तो 12GB RAM सह येतो.
OnePlus च्या फोनमध्ये 512GB पर्यंत स्टोरेज आणि 7400mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 50MP चा रियर कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus Pad Go 2 मध्ये MediaTek Dimensity 7300-Ultra प्रोसेसर आणि 10050mAh बॅटरीही दिली गेली आहे. OnePlus 15R चा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 47999 पासून सुरू होतो. 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 52999 आहे. बँक ऑफरनंतर, तुम्ही दोन्ही व्हेरिएंट अनुक्रमे ४४९९९ आणि ४७,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. त्यांची विक्री २२ डिसेंबरपासून सुरू होईल.
OnLups Pad Go 2 चा वाय-फाय व्हेरिएंट २६९९९ रुपयांपासून सुरू होतो. या किंमतीत १२८GB स्टोरेज व्हेरिएंटचा समावेश आहे. २५६GB स्टोरेज व्हेरिएंट २९९९९ रुपयांना उपलब्ध असेल. ५G व्हेरिएंटची किंमत ३२९९९ रुपये असेल. त्याची विक्री २६ डिसेंबरपासून सुरू होईल.


