Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Local Body Election Result : मतमोजणीपूर्वीच तीन ठिकाणी भाजपची सत्ता; ३ महिलांच्या नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब

Local Body Election Result : मतमोजणीपूर्वीच तीन ठिकाणी भाजपची सत्ता; ३ महिलांच्या नगराध्यक्षपदावर शिक्कामोर्तब

Local Body Election Result : महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल आज (२१ डिसेंबर २०२५) जाहीर होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून २८८ ठिकाणी मतदानाची मतमोजणी सुरू होईल. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला सर्वाधिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच राज्यातील तीन ठिकाणी निकाल लागले असून, तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता निश्चित झाली आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही ठिकाणी महिलाच नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा (दोंडाईचा-वरवडे) आणि सोलापूर जिल्ह्यातील अनगर या तीन नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. येथे भाजपच्या उमेदवारांशिवाय अन्य कोणत्याही पक्षाने किंवा अपक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे या ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष आणि सदस्य बिनविरोध निवडून आले. आज सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अधिकृत घोषणा करतील आणि विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देतील.

तिन्ही ठिकाणी महिला राजकीय नेतृत्व

– जामनेर (जळगाव) : साधना महाजन (भाजप) बिनविरोध नगराध्यक्ष. त्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी आहेत.
– दोंडाईचा (धुळे) : नयनकुंवर रावल (भाजप) बिनविरोध नगराध्यक्ष. त्या पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या माता आहेत.
– अनगर (सोलापूर) : प्राजक्ता पाटील (भाजप) बिनविरोध नगराध्यक्ष. त्या माजी आमदार राजन पाटील यांच्या सून आहेत.

अनगरमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर येथे सर्व १७ सदस्य आणि नगराध्यक्षपदासाठी फक्त भाजपचेच उमेदवार राहिले. राज्य निवडणूक आयोगाने बिनविरोध घोषित करण्यास मान्यता दिली आहे. येथे सर्व १७ प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

या बिनविरोध निवडींमुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच मोठी आघाडी मिळाली असून, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील स्पर्धेत भाजपची स्थिती मजबूत झाली आहे. उर्वरित ठिकाणच्या मतमोजणीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!