Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

चर्चा तर होणारच..! ७७ वर्षांच्या आजीबाईंनी मैदान मारलं; नगरसेवक पदी विजयी झाल्यावर अश्रू अनावर

चर्चा तर होणारच..! ७७ वर्षांच्या आजीबाईंनी मैदान मारलं; नगरसेवक पदी विजयी झाल्यावर अश्रू अनावर

Jalgaon Nagarparishad Election Result 2025 : महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकांच्या निकालात सत्ताधारी महायुतीने दणदणीत विजय मिळवला असताना, जळगावच्या नशिराबाद नगरपरिषदेतील एका निकालाने सर्वांचे लक्ष वेधले. येथे ७७ वर्षीय जनाबाई भगवान रंधे यांनी नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. विजयाची घोषणा होताच जनाबाईंना आनंदाश्रू अनावर झाले. कार्यकर्ते आणि नातेवाईकांच्या गळाभेटी घेताना त्यांच्या डोळ्यातील हे अश्रू उपस्थितांनाही भावूक करून गेले.

जनाबाई रंधे यांचा हा विजय केवळ राजकीय यश नसून, जिद्द, संघर्ष आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. आयुष्याच्या ७७व्या वर्षी नगरसेवक होण्याचा मान मिळवत त्यांनी ‘वय हे फक्त एक आकडा आहे’ असा संदेश दिला. मतमोजणी संपल्यानंतर नगरपरिषद प्रांगणात आल्यावर जनाबाई भावूक होऊन रडू लागल्या, तर उपस्थितांनी जल्लोष करत त्यांचे अभिनंदन केले.

नशिराबाद नगरपरिषदेत भाजपा-शिंदे सेना युतीने एकूण १४ जागांवर विजय मिळवला. येथे भाजपचे योगेश पाटील नगराध्यक्षपदी निवडून आले. हा विजय मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे पाटील यांनी सांगितले.

महायुतीचा घवघवीत विजय

राज्यातील एकूण २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीने २०७ नगराध्यक्ष पदे जिंकली. यात भाजपाने सर्वाधिक ११७ ते १२९ पदे पटकावली, शिंदे सेनेने ५३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ३२-३७ पदे मिळवली. दुसरीकडे, महाविकास आघाडीला फक्त ४४ पदांवर समाधान मानावे लागले.

नगरसेवकांच्या बाबतीत भाजपाने ३,३०० हून अधिक जागा जिंकल्या, जे आतापर्यंतच्या इतिहासातील एकाच पक्षाचा सर्वोत्तम विक्रम आहे. हा विजय विकासकामे आणि जनतेच्या विश्वासाचे फळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!