Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Devyani Pharande : नाशिकमध्ये भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर ! देवयानी फरांदे यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, ‘कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय’

Devyani Pharande : नाशिकमध्ये भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर ! देवयानी फरांदे यांना अश्रू अनावर; म्हणाल्या, ‘कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय’

Devyani Pharande : नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये सुरू असलेला ‘इनकमिंग’चा धडाका आता पक्षांतर्गत वादाचे कारण ठरला आहे. पक्षाचे नाशिक निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली असून, माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. “४० वर्षे पक्षाशी निष्ठा राखली, पण आज डोळ्यांसमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय,’ अशा शब्दांत त्यांनी आपली खंत मांडली.

नेमका वाद काय?

नाशिकमध्ये आज विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये माजी महापौर यतीन वाघ यांच्या प्रवेशाला फरांदे यांचा तीव्र विरोध होता. मात्र, त्यांच्या विरोधाला न जुमानता वरिष्ठ पातळीवरून हे पक्षप्रवेश घडवून आणले गेले. यामुळे नाराज झालेल्या फरांदे यांनी पक्षप्रवेश सोहळ्याकडे पाठ फिरवली आणि थेट आपली व्यथा मांडली.

हेही वाचा – Nashik Election BJP: गिरीश महाजनांना भाजपच्या निष्ठावंतांनी घेरलं, जोरदार रेटारेटी; VIDEO व्हायरल

फरांदे यांच्या नाराजीची कारणे –

कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षासाठी राबतात. जर आपल्याकडे आधीच सक्षम उमेदवार उपलब्ध असताना बाहेरच्यांना का आणले जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गिरीश महाजन यांच्यावर आपली नाराजी नसल्याचे सांगतानाच त्यांनी पक्षातील काही ‘दलालां’वर निशाणा साधला. महाजन यांना चुकीचे ब्रीफिंग दिले गेले. स्वतःच्या घरात तिकिटे मिळवण्यासाठी काही लोक हे राजकारण करत आहेत, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. मी स्वतःसाठी कधीच काही मागितले नाही, पण निष्ठावान कार्यकर्त्यांच्या संधीवर गदा येत असेल, तर ते मी सहन करू शकत नाही, असे म्हणताना त्यांना गहिवरून आले.

ज्यांना कोंडीत पकडायचे, त्यांनी पकडावे

पक्षातील काही लोक आपल्या विरोधात कटकारस्थान करत असल्याचा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला. मी कशालाही घाबरत नाही. ज्यांना मला कोंडीत पकडायचे आहे, त्यांनी खुशाल प्रयत्न करावेत. जुने नेते जर माझ्या भूमिकेच्या पाठीशी उभे राहिले असते, तर कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश गेला असता, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!