Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, उमेदवारीवरून दोन गटांत हाणामारी, नेमकं काय घडलं?

संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, उमेदवारीवरून दोन गटांत हाणामारी, नेमकं काय घडलं?

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षात मोठा अंतर्गत वाद उफाळून आला आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून पक्षाने मोहम्मद इसरार यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी किराडपुरा भागात आनंद रॅली काढली होती. मात्र, याच प्रभागातून इच्छुक असलेले हाजी इसाक यांच्या समर्थकांनी रॅली अडवली आणि दोन्ही गटांत शाब्दिक चकमक झाली, जी पुढे हाणामारीत रूपांतरित झाली.

२६ डिसेंबर रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेत हाजी इसाक समर्थकांनी इसरार समर्थकांना मारहाण केली आणि शिवीगाळ केल्याचे समोर आले आहे. रॅली राम मंदिर रोडवर पोहोचताच हंगामा सुरू झाला, ज्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. रॅली अर्ध्यावरच थांबवावी लागली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नुकतीच उमेदवारांची यादी जाहीर केली होती, ज्यात अनेक इच्छुकांचे नाव कापल्याने नाराजी होती.

या घटनेमुळे AIMIMच्या अंतर्गत कलह उघड झाला आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाने संभाजीनगरसह इतर शहरांत उमेदवार जाहीर केले आहेत, मात्र असे वाद पक्षाच्या एकजुटीला धक्का देणारे ठरत आहेत.

महायुतीतही जागावाटपाचा तिढा कायम

दरम्यान, संभाजीनगर महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागावाटपावर अद्याप तोडगा निघालेला नाही. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रात्री उशिरा चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी “१०० टक्के ठरले” असे सांगितले, मात्र अधिकृत घोषणा झालेली नाही. सात बैठका झाल्यानंतरही निर्णय होत नसल्याने युती अधांतरी आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीपूर्वी हा तिढा सुटणे गरजेचे आहे. संभाजीनगरातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील दिवसांत आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!