Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट! हुंड्याच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; अटकेच्या भीतीने पतीनेही नागपुरात संपवलं जीवन

कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट! हुंड्याच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; अटकेच्या भीतीने पतीनेही नागपुरात संपवलं जीवन

Nagpur Crime : हुंड्यासाठी छळ आणि पत्नीच्या आत्महत्येच्या घटनेने हादरलेल्या एका कुटुंबाचा नागपुरात करुण अंत झाला आहे. बंगळुरू येथील सॉफ्टवेअर इंजिनिअर सूरज याने नागपुरातील वर्धा रोडवरील ‘हॉटेल रोयाल वीला’मध्ये आत्महत्या केली असून, त्याच्यासोबत विष प्राशन केलेल्या आईची (जयंती) प्रकृती अत्यंत गंभीर आहे. सूरजची पत्नी गानवी (वय 26) हिने छळाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या अवघ्या काही तासांनंतर हा प्रकार घडला.

काय आहे नेमकं प्रकरण?

बेंगळुरू येथील रहिवासी असलेल्या सूरजचे लग्न 29 ऑक्टोबर 2025 रोजी गानवी उर्फ राशी हिच्याशी झाले होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या काही दिवसांतच सुखी संसाराला गालबोट लागले. लग्नाच्या रिसेप्शनसाठी 40 लाख रुपयांची मागणी करत सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांनी गानवीचा छळ केल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केला आहे. श्रीलंकेत हनिमूनला गेले असतानाही हा छळ सुरूच असल्याने गानवीने सहल अर्धवट सोडली आणि ती माहेरी परतली होती. गानवीने राहत्या घरी गळफास घेतला आणि 26 डिसेंबर 2025 रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा – Sagar Dhanore Death : काँग्रेस नेत्याच्या पुतण्याची कारमध्ये गोळी झाडून आत्महत्या; जालन्यात खळबळ

नागपुरात आत्महत्येचा प्रयत्न

गानवीच्या मृत्यूनंतर बेंगळुरूमध्ये सूरजच्या कुटुंबाविरोधात जनक्षोभ उसळला होता. संतप्त नातेवाईकांनी सूरजच्या घरासमोर मृतदेह ठेवून निदर्शने केली होती. दरम्यान, कारवाईच्या भीतीने किंवा मानसिक धक्क्यातून सूरज आणि त्याची आई जयंती हे नागपुरात आले होते. स्थानिक हॉटेलमध्ये मुक्कामास असताना दोघांनीही टोकाचे पाऊल उचलले. यात सूरजचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस कारवाई आणि कायदेशीर पेच

बेंगळुरूच्या राममूर्तीनगर पोलिसांनी सुरुवातीला छळाचा गुन्हा दाखल केला होता, मात्र गानवीच्या मृत्यूनंतर त्याचे रूपांतर ‘हुंडाबळी’ या गंभीर गुन्ह्यात करण्यात आले. भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार सूरज आणि त्याच्या कुटुंबीयांवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता या प्रकरणाला नागपुरातील आत्महत्येमुळे नवीन वळण मिळाले असून, दोन राज्यांतील पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!