MNS Candidate List: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली ५३ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. यंदाच्या निवडणुकीत विशेष म्हणजे ‘ठाकरे बंधू’ म्हणजेच शिवसेना (UBT) आणि मनसे यांच्यात ऐतिहासिक युती झाली असून, या जागावाटपाच्या सूत्रानुसार मनसे ५३ जागांवर आपले नशीब आजमावणार आहे. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गट १६३ जागा लढवणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला या युतीमध्ये ११ जागा देण्यात आल्या आहेत. या यादीमध्ये मनसेने अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग १९२ मधून यशवंत किल्लेदार, प्रभाग २२६ मधून बबन महाडिक, प्रभाग २१४ मधून मुकेश भालेराव, प्रभाग ५५ मधून शैलेंद्र मोरे आणि प्रभाग ८ मधून कस्तुरी रोहेकर यांसारख्या आक्रमक नेत्यांचा समावेश आहे. तसेच महिला आघाडीतील अनेक पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी या निवडणुकीत ताकद दिली असून, विजय कृष्णा पाटील (प्रभाग १०), कविता बागुल माने (प्रभाग ११), आणि सोनाली देव मिश्रा (प्रभाग २१) यांसारखी नावे आघाडीवर आहेत.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार, मुंबईसह राज्यातील सर्व प्रमुख महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून, ३ जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १६ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतमोजणीतून मुंबईच्या सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार, याचा फैसला होणार आहे.
मनसेची संपूर्ण उमेदवार यादी (प्रभागानुसार):
प्रभाग क्रमांक ८ मधून कस्तुरी रोहेकर, १० मधून विजय कृष्णा पाटील, ११ मधून कविता बागुल माने, १४ मधून पुजा कुणाल माईणकर, १८ मधून सदिच्छा मोरे, २० मधून दिनेश साळवी, २१ मधून सोनाली देव मिश्रा, २३ मधून किरण अशोक जाधव, २७ मधून आशा विष्णू चांदर, ३६ मधून प्रशांत महाडीक, ३८ मधून सुरेखा परब लोके, ४६ मधून स्नेहिता संदेश डेहलीकर, ५५ मधून शैलेंद्र मोरे, ५८ मधून वीरेंद्र जाधव, ६७ मधून कुशल सुरेश धुरी, ६८ मधून संदेश देसाई, ७४ मधून विद्या भरत आर्य, ८१ मधून शबनम शेख, ८४ मधून रूपाली दळवी, ८५ मधून चेतन बेलकर, ९८ मधून दिप्ती काते, १०२ मधून अनंत हजारे, १०३ मधून दिप्ती राजेश पांचाळ, १०६ मधून सत्यवान दळवी, ११० मधून हरीनाक्षी मोहन चिराथ, ११५ मधून ज्योती अनिल राजभोज, ११९ मधून विश्वजीत शंकर ढोलम, १२८ मधून सई सनी शिर्के, १२९ मधून विजया गिते, १३३ मधून भाग्यश्री अविनाश जाधव, १३९ मधून शिरोमणी येशू जगली, १४३ मधून प्रांजल राणे, १४६ मधून राजेश पुरभे, १४९ मधून अविनाश मयेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, १५० मधून सविता माऊली थोरवे, १५२ मधून सुधांशू दुनबळे, १६६ मधून राजन मधुकर खैरनार, १७५ मधून अर्चना दिपक कासले, १७७ मधून हेमाली परेश भनसाली, १७८ मधून बजरंग देशमुख, १८३ मधून पारूबाई कटके, १८८ मधून आरिफ शेख, १९२ मधून यशवंत किल्लेदार, १९७ मधून रचना साळवी, २०५ मधून सुप्रिया दळवी, २०७ मधून शलाका हरियाण, २०९ मधून हसीना महिमकर, २१२ मधून श्रावणी हळदणकर, २१४ मधून मुकेश भालेराव, २१६ मधून राजश्री नागरे, २१७ मधून निलेश शिरधनकर, २२३ मधून प्रशांत गांधी, आणि २२६ मधून बबन महाडीक या उमेदवारांना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे.


