Today बुधवार, 16th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Faridabad: धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं, हरियाणामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Faridabad: धावत्या कारमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं, हरियाणामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

Faridabad Gang Rape News: हरियाणाच्या फरिदाबादमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरी जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या एका महिलेवर दोन नराधमांनी धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर विरोध केल्यावर महिलेला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून दिले.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्री १२ च्या सुमारास घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभी होती. यावेळी एका कारमधून आलेल्या दोन तरुणांनी तिला घरी सोडण्याचे आमिष दाखवून कारमध्ये बसवले. महिलेने विश्वास ठेवून कारमध्ये प्रवेश केला, मात्र आरोपींनी तिला घराकडे न नेता कार गुरुग्राम-फरिदाबाद रस्त्याच्या दिशेने सुसाट पळवली.

दोन तास अत्याचार आणि बेदम मारहाण :

आरोपींनी सुमारे दोन तास फरिदाबादच्या रस्त्यांवर कार फिरवली. या दरम्यान दोघांनीही पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला. जेव्हा महिलेने या कृत्याला विरोध केला, तेव्हा आरोपींनी तिला क्रूरपणे मारहाण केली. मध्यरात्रीवाजेच्या सुमारास, गंभीर जखमी आणि रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या महिलेला आरोपींनी धावत्या कारमधून रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तेथून पळ काढला.

पीडितेची प्रकृती चिंताजनक

रस्त्यावर पडल्यामुळे महिलेच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आहे. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक मदतीला धावले आणि त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला फरिदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर, प्रकृती अधिक बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून तिची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

पोलिसांची तत्पर कारवाई; दोन्ही आरोपी अटकेत

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पीडितेच्या बहिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली आहे.

या कलमान्वये गुन्हे दाखल, कलम ३७६ (ड): सामूहिक बलात्कार, कलम ३२३: जीवघेणा हल्ला / मारहाण आणि कलम ३४: समान उद्देशाने केलेले कृत्य. असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!