Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

North Korea attack on South Korea: जगभरात मोठी खळबळ! अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर उत्तर कोरियाचा नॉर्थ कोरियावर मिसाईल हल्ला; एकामागून एक मिसाईल डागल्या

North Korea attack on South Korea: जगभरात मोठी खळबळ! अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर उत्तर कोरियाचा नॉर्थ कोरियावर मिसाईल हल्ला; एकामागून एक मिसाईल डागल्या

North Korea Attack on South Korea: अमेरिकेनं शनिवारी व्हेनेझुएलावर हल्ला केला, अमेरिकन सैन्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे. यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला आहे, तर दुसरीकडे आता नॉर्थ कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नॉर्थ कोरियानं साउथ कोरियावर मिसाईल हल्ला केला आहे. सोबतच नॉर्थ कोरियाकडून आता मिसाईलच प्रोडक्शन देखील वाढवलं जात आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे –म्युंग हे सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. ली जे –म्युंग हे चीनच्या दौऱ्यावर असतानाच आता उत्तर कोरियानं दक्षिण कोरियावर मिसाईल हल्ला केला आहे. रविवारी उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर भीषण हल्ला केला आहे. विशेष म्हणजे अमेरिकेनं व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच उत्तर कोरियानं दक्षिण कोरियावर हल्ला केला आहे.

अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर अता उत्तर कोरियानं दक्षिण कोरियावर हल्ला केला आहे, उत्तर कोरियामध्ये हालचाली वाढल्या असून, जगावर आणखी एक मोठं संकट येण्याचे हे संकेत आहेत, कारण उत्तर कोरियानं आपल्या शस्त्रास्त्रांचं उत्पादन दुपटीने वाढवलं आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी मीडियानुसार किम जोंग उन यांनी आपल्या देशातील मिसाईलचं उत्पादन दुपटीने वाढवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता संपूर्ण जगाचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोरियावर हल्ला

उत्तर कोरियानं अनेक मिसाईल दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले आहेत. विशेष म्हणजे जेव्हा दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती हे चीनच्या दौऱ्यावर असताना उत्तर कोरियानं हा हल्ला केला आहे. उत्तर कोरियाच्या अण्ववस्त्र कार्यक्रमावर चर्चा व्हावी हा देखील त्यामागे एक उद्देश असल्याचं बोललं जात आहे.

दक्षिण कोरियाने बोलावली अपतकालीन बैठक

दक्षिण कोरियाने या हल्ल्यानंतर अपतकालीन बैठक बोलावली आहे, दक्षिण कोरियामध्ये देखील हालचालींना वेग आला असून, कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडू शकतो अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे जपान आणि दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियानं केलेल्या या मिसाईल हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!