मुंबई : धुरंधर चित्रपटानंतर अभिनेता अक्षय खन्नाच्या प्रसिद्धीत वाढ होताना दिसत आहे. आदित्य धरच्या ‘धुरंधर’मधील त्याच्या भूमिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘धुरंधर’च्या रिलीजनंतर तो एका रात्रीत लोकप्रिय झाला. ‘अॅनिमल’च्या रिलीजनंतर बॉबी देओलसोबतही अशीच परिस्थिती घडली.
मर्यादित स्क्रीन टाईम आणि संवाद नसतानाही तो ‘अॅनिमल’मध्ये लोकप्रिय झाला. आता, ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेल्या दरोडेखोर रेहमानच्या भूमिकेने चाहते उत्सुक झाले आहेत. अक्षय खन्ना आणि बॉबी देओल पुन्हा एकदा ‘हमराझ’मध्ये एकत्र पाहण्याची मागणी करत आहेत. चित्रपट निर्माते रतन जैन यांनी सांगितले की, ‘जर मला या दोन्ही कलाकारांसाठी योग्य पटकथा सापडली तर मी ‘हमराझ २’ बनवू शकतो. आम्हाला अशा पटकथेची आवश्यकता आहे जी दोघांनाही साजेशी असेल आणि त्यांच्या वयाला साजेशी भूमिका असतील’.
अक्षय आणि बॉबीसोबत काम करण्याचा त्यांचा अनुभव सांगताना ते म्हणाले, बॉबीसोबत काम करणे मजेदार आहे. अक्षयसोबतही असेच आहे. या जबरदस्त यशानंतर अक्षय खन्नाचे सगळीकडे कौतुक होत आहे. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. त्याला चांगले चित्रपट मिळाले पाहिजेत.


