Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Rohit Pawar and Ajit Pawar: रोहित पवार करणार घड्याळाचा प्रचार; अजित पवारांसह एकाच मंचावरून विरोधकांवर साधणार निशाणा

Rohit Pawar and Ajit Pawar: रोहित पवार करणार घड्याळाचा प्रचार; अजित पवारांसह एकाच मंचावरून विरोधकांवर साधणार निशाणा

Rohit Pawar and Ajit pawar: राज्यातील महापालिका निवडणुकांचा धुरळा उडू लागला असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट आणि शरद पवार गट) वाढती जवळीक राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. “राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो,” असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून, आजपासून रोहित पवार त्यांच्यासोबत प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या पॉडकास्टमध्ये बोलताना अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. “दोन्ही पक्षांनी एकत्र यायचे की नाही, याचा विचार सध्या तरी केलेला नाही.

निवडणुकीच्या धावपळीत सध्या पूर्ण लक्ष उमेदवारांच्या निवडीवर आणि प्रचारावर आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील युतीचे संकेत देताना ते म्हणाले, “कायमचा शत्रू किंवा मित्र कोणीच नसतो, यावरून तुम्हाला काय ओळखायचे ते ओळखा!”

पिंपरी-चिंचवडमध्ये काका-पुतण्या एकाच मंचावर!

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादींनी युती केली असली, तरी बडे नेते अद्याप प्रचारात एकत्र दिसले नव्हते. मात्र, आजपासून हे चित्र बदलणार आहे. आमदार रोहित पवार आजपासून पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांसोबत प्रचारात सक्रिय होत आहेत.

विशेष म्हणजे, ते ‘तुतारी’ आणि ‘घड्याळ’ या दोन्ही चिन्हांचा प्रचार करणार आहेत. अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच खासदार सुप्रिया सुळे आणि निलेश लंके हे देखील पुणे व पिंपरीच्या प्रचारात सहभागी होतील.

भाजपवर निशाणा साधणार?

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार पुणे आणि पिंपरीतील भाजप नेत्यांवर सडकून टीका करत आहेत. आता रोहित पवार सोबतीला आल्यावर, ‘काका-पुतणेमिळून भाजपवर काय तोफ डागतात आणि प्रचाराची दिशा काय असते, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!