Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो…’; देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

‘निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो…’; देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

Pune News: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर सभेतून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करतानाच, त्यांनी भाजप आमदार महेश लांडगे यांना संयम राखण्याचा सल्ला दिला. आपले काम बोलत असल्यानेच विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, असं म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.

महेश लांडगेंना ‘दादा’ स्टाईल सल्ला

सभेत बोलताना फडणवीस म्हणाले, “निवडणुका आल्या की अनेकांचा कंठ फुटतो. महेश दादा, विरोधकांच्या टीकेने तुम्ही वैतागू नका. आपण केलेल्या विकासकामांचा हा राग आहे. त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे नाहीत, म्हणून ते निवडणुकीला वादाच्या वळणावर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही फक्त कामावर लक्ष द्या.”

हेही वाचा – PMC Election: मुख्यमंत्री मांडणार पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’; ‘नॅशनल क्रश’ गिरीजा ओक घेणार देवेंद्र फडणवीसांची विशेष मुलाखत

2014 नंतर शहराचा चेहरा बदलला

कष्टकरी आणि भूमीपुत्रांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडला भाजपने आधुनिक स्वरूप दिल्याचे फडणवीस यांनी आवर्जून सांगितले. 2014 नंतर राबवलेल्या विकास प्रकल्पांमुळे शहराचे रूप पालटले असून, हेच प्रगतीचे चक्र पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

घरकुल योजना आणि भ्रष्टाचारावरून टोला

भाजप सरकारच्या काळातील ‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणि आधीच्या सरकारच्या योजनांच्या वेगाची तुलना करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले. आमच्या काळात घरे कशी होती आणि आताची प्रगती काय आहे, हे जनतेला माहित आहे. मागच्या वेळीपेक्षा अधिक जागांवर भाजप विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भविष्यकाळातील आव्हाने

पुणे जिल्ह्याच्या वाढत्या विस्तारामध्ये पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या पुण्यापेक्षाही अधिक होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला साजेसे उत्तम शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधा पुरवण्यावर भाजपचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळांचा दर्जा सुधारण्याला आपले प्राधान्य असल्याचेही ते म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!