Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election 2026 : लाडक्या बहिणींना 5 लाखांचे बिनव्याजी कर्ज, स्टार्टअपसाठी इनोव्हेशन हब; मुंबईसाठी महायुतीचा भव्य जाहीरनामा जाहीर

BMC Election 2026 : लाडक्या बहिणींना 5 लाखांचे बिनव्याजी कर्ज, स्टार्टअपसाठी इनोव्हेशन हब; मुंबईसाठी महायुतीचा भव्य जाहीरनामा जाहीर

मुंबई : मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर महायुतीचा बहुप्रतिक्षित जाहीरनामा आज सकाळी 11 वाजता वांद्र्यातील एमसीए क्लबमध्ये प्रसिद्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा जाहीर केला जाणार आहे. जाहीरनाम्यापूर्वीच त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांची माहिती समोर आली असून, महिला, युवक आणि पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे.

महायुतीच्या जाहीरनाम्यात राज्य सरकारच्या धर्तीवर ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थींना आत्मनिर्भर करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच तरुण उद्योजक आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबईत इनोव्हेशन हब स्थापन करण्याची घोषणा करण्यात येणार आहे.

मुंबईतील पायाभूत सुविधांवर भर देताना युटिलिटी कॉरिडॉर उभारणीसह सुरू असलेले सर्व सिमेंट काँक्रीट रस्ते वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी तब्बल १७ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद असून, यासाठी स्वतंत्र पर्यावरण प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी AI आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरावर भर देण्यात येणार असल्याचाही उल्लेख जाहीरनाम्यात आहे. यामुळे नागरिकांना सेवा जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, महायुतीच्या जाहीरनाम्याच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत राजकीय वातावरण तापणार आहे. नाशिकनंतर आज मुंबईत शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची ऐतिहासिक संयुक्त सभा होणार आहे. तब्बल २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसणार असून, या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मराठी मतदारांना नेमका काय संदेश दिला जाणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!