Today मंगळवार, 13th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी विदेश शिक्षणाची दारे उघडणारे एडुलक्सचे मार्गदर्शन शिबिर आयोजित

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी विदेश शिक्षणाची दारे उघडणारे एडुलक्सचे मार्गदर्शन शिबिर आयोजित

‌‌इंदापूर : प्रतिनिधी

विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूर येथील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन व विदेश शिक्षण या विषयावर एडुलक्स एज्युकेशनल कन्सल्टंट्स यांच्यावतीने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजच्या प्रशस्त सभागृहात करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागतपर भाषणात प्रा. सुनील शिंदे यांनी एडुलक्स एज्युकेशनल कन्सल्टंट्सच्या तज्ज्ञांचे महाविद्यालयात स्वागत करताना सांगितले की, आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना केवळ स्थानिक नव्हे तर आंतरराष्ट्रीय संधींची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होते तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‌यावेळी एडुलक्स ओव्हरसीजचे सहसंस्थापक (Co-Founder) व काउन्सलर गौरव शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विदेश शिक्षणाच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी विशेषतः जर्मनीतील उच्च शिक्षण व्यवस्थेवर प्रकाश टाकत सांगितले की, जर्मनीमध्ये दर्जेदार व तुलनेने कमी खर्चिक शिक्षण उपलब्ध असून अनेक सार्वजनिक विद्यापीठांमध्ये ट्युशन फी अत्यल्प आहे. जर्मनीत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना पार्ट-टाइम काम करण्याची परवानगी असून त्यातून दरमहा उत्पन्न मिळू शकते. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण व राहणीमानाचा खर्च भागविण्यास मोठी मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले. पार्ट-टाइम कामामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याबरोबरच आंतरराष्ट्रीय कामाचा अनुभव, भाषा कौशल्ये आणि व्यावसायिक आत्मविश्वास प्राप्त होतो, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी काउन्सलर सायली यादव यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, विदेशात शिक्षण घेण्यासाठी केवळ आर्थिक तयारी पुरेशी नसून शैक्षणिक नियोजन, योग्य अभ्यासक्रमाची निवड, भाषा कौशल्ये आणि वेळेचे नियोजन या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रवेश प्रक्रियेची माहिती लवकर घेतल्यास विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक प्रोफाइल सक्षम करण्यासाठी इंटर्नशिप, प्रोजेक्ट्स आणि अतिरिक्त कौशल्यांवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले. तसेच व्हिसा प्रक्रियेदरम्यान घ्यावयाची काळजी, इंटरव्ह्यूची तयारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक असलेली संवाद कौशल्ये विकसित करण्याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना परफेक्ट प्रोफाइल कसे तयार करावे, योग्य विद्यापीठाची निवड कशी करावी, ऑफर लेटर (Offer Letter) कसे मिळवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना दोन्ही तज्ज्ञांनी सविस्तर व समर्पक उत्तरे दिली.

यावेळी एडुलक्स एज्युकेशनल कन्सल्टंट्सचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह निनाद तावरे हे देखील उपस्थित होते.

विद्यार्थी मार्गदर्शन प्रणाली (Students Mentoring Cell)अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशिक्षण व नियुक्ती विभागाचे अधिकारी प्रा. योगेश जाधव यांनी केले. विद्यार्थी मार्गदर्शन प्रणालीचे अध्यक्ष प्रा. राजीव वाघमारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करणारी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. विदेश शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वातावरणाचा अनुभव मिळतो तसेच संशोधन, नावीन्यपूर्ण विचार आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित होतात. विद्यार्थ्यांनी करिअरचे निर्णय घेताना स्वतःची आवड, क्षमता आणि दीर्घकालीन उद्दिष्टे लक्षात घेऊन योग्य दिशा निवडावी, असे आवाहन त्यांनी केले.

या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विदेश शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातील करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!