नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीमध्ये अनेक बदल दिसून येत आहे. त्यात गुगल आणि अॅपल यांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे. दोन्ही कंपन्यांनी बहु-वर्षीय सहकार्याची घोषणा केली. या सहकार्याअंतर्गत, तुम्हाला आयफोनवर गुगल जेमिनी-आधारित सिरी दिसेल. अॅपल बऱ्याच काळापासून सिरी अपडेट करण्यावर काम करत आहे.
२०२५ मध्ये होणारा प्रमुख सिरी लाँचिंग देखील २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आला. हे मुख्यत्वे अॅपल एआय रेसमध्ये मागे पडल्यामुळे आहे. या सहकार्यातून हे देखील स्पष्ट होते की, अॅपलने गुगलसोबत सहकार्य केले आहे, कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदन देखील जारी केले आहे. गुगल-अॅपलच्या निवेदनानुसार, अॅपलने काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यानंतर गुगलची तंत्रज्ञान निवडली. जेमिनी त्याच्या पुढील पिढीच्या मॉडेलसाठी सर्वात सक्षम पाया प्रदान करू शकते.
जेमिनी-आधारित फाउंडेशन मॉडेलमुळे, भविष्यात आयफोन, आयपॅड आणि मॅकवर अनेक एआय फीचर्स उपलब्ध असतील. युजर्संना सिरीद्वारे अधिक वैयक्तिकृत आणि सक्षम सहाय्यक मिळेल. कंपनीने असेही सांगितले की, यावर्षी सिरीची नवीन व्हर्जन आणले जाईल.


