Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

PADU Machine: निवडणूक आयोगाकडून वापण्यात येणाऱ्या PADU मशीनवर ठाकरे बंधूंचा आक्षेप; ‘पाडू’ नेमकं कसं काम करत?

PADU Machine: निवडणूक आयोगाकडून वापण्यात येणाऱ्या PADU मशीनवर ठाकरे बंधूंचा आक्षेप; ‘पाडू’ नेमकं कसं काम करत?

BMC Election 2026 PADU Machine: मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. सगळ्याची पक्षांची धाकधूक वाढली असतानाच निवडणूक आयोगाने PADU मशीन वापरणार असल्याच सांगितलं आहे. पण हे मशीन EVM बंद पडल्यास वापरणार असल्याच सांगितलं जात आहे. त्यावर राज ठाकरेंनी मोठा आक्षेप नोंजवला आहे. हा निर्णय आधी का घेण्यात आला नाही. असं राड ठाकरेंनी म्हटल आहे.

प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट

निवडणूक आयोगाने आता एक PADU नावाचं नवीन मशीन आणलं आहे. प्रिंटींग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट (PADU) मशीन असं त्याचे नाव आहे. ते उद्या सगळीकडे ठेवलं जाणार आहे. ईव्हीएम बंद पडलं, तर हे मशीन वापरलं जाणार आहे. पण याबाबत कोणतीही माहिती निवडणूक आयोगाने दिली नव्हती. ईव्हीएमला नवं मशीन जोडण्यासंबंधी आधी का माहिती दिली नाही?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. तर PADU मशीन अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरलं जाणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.

PADU मशीन सरसकट वापरलं जाणार नाही

PADU मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही. अपवादात्मक(इमरजेंसी) परिस्थितीमध्ये हे PADU मशीन वापरलं जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणूण हे मशीन गरज पडली तर वापरलं जाईल. ईव्हीएम मशीन अचानक बंद झाली किंवा तांत्रिक अडचण आली तर हे मशीन वापरलं जाईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली.

PADU मशीन कसं काम करतं
मुंबई महापालिका निवडणुकीत भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीची M3A हे मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहेत. या यंत्राद्वारे नोंदविलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला >पॅलेटयुनिट जोडूनच करणे आवश्यक आहे. जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल, तर भारत इलेक्ट्रिक लिमिटेड या कंपनीने विकसित केलेल्या PADU युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेला 140 PADU मशीन प्राप्त झालेल्या आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!