Today मंगळवार, 21st एप्रिल 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

निकालाआधीच महायुतीला मोठं यश; राज्यात ६९ नगरसेवक बिनविरोध विजयी, वाचा संपूर्ण यादी

निकालाआधीच महायुतीला मोठं यश; राज्यात ६९ नगरसेवक बिनविरोध विजयी, वाचा संपूर्ण यादी

मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी आज मतमोजणीला सुरुवात होत असताना, निकाल जाहीर होण्याआधीच महायुतीला मोठे यश मिळाले आहे. राज्यभरातून तब्बल ६९ उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आले असून, यामध्ये भाजपने सर्वाधिक जागांवर विजय मिळवला आहे. सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून या बिनविरोध उमेदवारांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक संख्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील आहे. केडीएमसीमध्ये भाजपचे १५ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. जळगावमध्ये १२, पनवेलमध्ये ८ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

ठाण्यात ७, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत. अहिल्यानगरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड आणि धुळे महानगरपालिकेतही भाजपने बिनविरोध विजयाचे खाते उघडले आहे. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे.

महानगरपालिकानिहाय बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या

कल्याण-डोंबिवली: २१ (भाजप – १५, शिवसेना (शिंदे) – ६)
जळगाव: १२ (भाजप -६, शिवसेना (शिंदे) – ६)
पनवेल: ८ (भाजप – ८)
ठाणे: ७ (शिवसेना (शिंदे) – ७)
भिवंडी: ६ (भाजप -६)
अहिल्यानगर: ५ (भाजप – ३, राष्ट्रवादी (अजित पवार) – २)
धुळे: भाजप -३
पुणे: भाजप – २
पिंपरी-चिंचवड: भाजप -२
मालेगाव: इस्लाम पार्टी – १

कुणाचे कुठे बिनविरोध उमेदवार :

भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची यादी :

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

प्रभाग १८ – रेखा चौधरी

प्रभाग २६ क – आसावरी नवरे

प्रभाग २६ ब – रंजना

प्रभाग २४ ब – ज्योती पाटील

प्रभाग २७ अ – मंदा पाटील

प्रभाग २६ अ -मुकुंद पेडणेकर

प्रभाग २७ ड -महेश पाटील

प्रभाग १९ क – साई शेलार

प्रभाग २३ क -हर्षदा भोईर

प्रभाग २३ अ -दीपेश म्हात्रे

प्रभाग २३ ड – जयेश म्हात्रे

प्रभाग ३० अ – रविना माळी

प्रभाग २५ ड – मंदार हळबे

प्रभाग 19 ब – डॉ.सुनिता पाटील

प्रभाग 19 अ – पूजा म्हात्रे

पनवेल महानगरपालिका –

प्रभाग १८ अ – ममता म्हात्रे

प्रभाग १८ ब – नितिन पाटील

प्रभाग १८ क – स्नेहल ढमाले

प्रभाग १९ अ – दर्शना भोईर

प्रभाग १९ ब – रूचिरा लोंढे

प्रभाग २० अ – अजय बहिरा

प्रभाग २० ब – प्रियांका कांडपिळे

भिवंडी महानगर पालिका –

प्रभाग १७ अ – सुमित पाटील

प्रभाग १६ अ – परेश चौगुले

प्रभाग १८ ब – दीपा मढवी

प्रभाग १८ अ – अश्विनी फुटाणकर

प्रभाग १८ क – अबू साद लल्लन

प्रभाग २३ ब – भारती चौधरी

धुळे महानगरपालिका

प्रभाग क्र १ – उज्ज्वला भोसले

प्रभाग ६ ब -ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील

प्रभाग १७ म- सुरेखा उगले़

अहिल्यानगर महानगरपालिका

प्रभाग 7 ब -अनिल बोरूडे

प्रभाग 2 ड – करण कराळे

प्रभाग 2 ब – सोनाबाई शिंदे

जळगाव महानगरपालिका

प्रभाग ७ अ – विशाल भोळे

प्रभाग ७ अ – दीपमाला काळे

प्रभाग १६ अ – डॉ वीरेन खडके

प्रभाग १३ क-वैशाली पाटील

प्रभाग ७-ब – अंकिता पाटील

प्रभाग १२ ब – उज्ज्वला बेंडाळे

पुणे महानगरपालिका

प्रभाग ३५ – मंजुषा नागपुरे

प्रभाग ३५ ड – श्रीकांत जगताप

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

प्रभाग ६ ब – रवी लांडगे

प्रभाग १० ब – सुप्रिया चांदगुडे

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

प्रभाग २४ अ – रमेश म्हात्रे

प्रभाग २४ ब -विश्वनाथ राणे

प्रभाग २४ क – वृषाली जोशी

प्रभाग २८ अ – हर्षल राजेश मोरे

प्रभाग ११ अ – रेश्मा निचळ

प्रभाग २८ ब – ज्योती मराठे

ठाणे महानगर पालिका –

प्रभाग १८ ब – जयश्री फाटक

प्रभाग १८ क – सुखदा मोरे

प्रभाग १७ अ – एकता भोईर

प्रभाग १८ ड – राम रेपाळे

प्रभाग १४ अ -शीतल ढमाले

प्रभाग ५ ब – जयश्री डेव्हिड

प्रभाग ५ अ -सुलेखा चव्हाण

जळगाव महानगर पालिका –

प्रतिभा देशमुख

विक्रम सोनवणे

मनोज चौधरी

रेखा पाटील

सागर सोनवणे

गौरव सोनवणे

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अहिल्यानगरमध्ये २ ठिकाणी यश –

कुमार वाकळे

प्रकाश भागानगरे

मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या मुनिरा शेख फकीर मोहम्मद बिनविरोध निवडून आल्या.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!