Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Maharashtra Politics : महापालिका निकालाआधी नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ; शरद पवार गटाचे शहराध्यक्षांचा राजीनामा

Maharashtra Politics : महापालिका निकालाआधी नाशिकमध्ये राजकीय उलथापालथ; शरद पवार गटाचे शहराध्यक्षांचा राजीनामा

नाशिक : राज्यातील २९ महापालिकांचे निकाल आज जाहीर होणार असताना, त्याआधीच नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जवळपास आठ ते नऊ वर्षांनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गजानन शेलार यांची पक्षातून हकालपट्टी होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, कारवाई होण्याआधीच त्यांनी स्वतः राजीनामा दिला. निवडणूक काळात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिकमध्ये सभा न घेतल्याने आपण नाराज असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, निवडणूक काळातील शेलार यांच्या भूमिकेबाबत पक्षातील वरिष्ठ नेते असमाधानी असल्याचीही माहिती आहे. गजानन शेलार यांचे पुतणे राहुल शेलार भाजपकडून प्रभाग १३ मधून निवडणूक लढवत असून, त्यांच्या प्रचारात गजानन शेलार सहभागी झाल्याचा आरोप होता. त्यामुळेच त्यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची टांगती तलवार होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती.

महापालिका निवडणुकीच्या निकालाच्या अवघ्या काही तास आधी गजानन शेलार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पुढील काळात ते कोणत्या पक्षात किंवा गटात प्रवेश करणार, तसेच त्यांची राजकीय भूमिका काय असणार, याकडे आता नाशिककरांचे आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!